श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापती, उपसभापती यांचा राजीनामा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 13:51 IST2019-06-13T13:50:50+5:302019-06-13T13:51:48+5:30

श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापती पुरूषोत्तम लगड व उपसभापती प्रतिभा झिटे यांनी राजीनामा दिला आहे.

Shrigonda Panchayat Committee Chairman, Deputy Chairman, resigns | श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापती, उपसभापती यांचा राजीनामा 

श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापती, उपसभापती यांचा राजीनामा 

श्रीगोंदा : श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापती पुरूषोत्तम लगड व उपसभापती प्रतिभा झिटे यांनी राजीनामा दिला आहे.
माजी मंत्री बबनराव पाचपुते, भगवानराव पाचपुते, सदाअण्णा पाचपुते, बाळासाहेब महाडिक यांच्या उपस्थितीत दोन दिवसांपुर्वी एक बैठक झाली. या बैठकीत सभापती, उपसभापती यांचे राजीनामे घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार नलगे व झिटे यांनी राजीनामा दिला.  सभापती पदासाठी शहाजी हिरवे तर उपसभापती पदासाठी मनिषा कोठारे यांची निवड निश्चित मानली जाते.
श्रीगोंदा पंचायत समितीत भाजपाचे सात तर दोन्ही काँग्रेसचे पाच सदस्य आहेत. पण विखे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे अण्णासाहेब शेलार व रंजनी सिध्देश्वर देशमुख हे भाजपात मदत करण्याची शक्यता आहे मात्र बाबासाहेब भोस समर्थक आशाबाई सुरेश गोरे ह्या भाजपाच्या विरोधात भुमिका घेण्याची शक्यता आहे.

विखेंचा निर्णय अंतिम 
 मी व सिध्देश्वर देशमुख विखे पाटलांच्या विचाराने राजकारण करीत आहे. सभापती व उपसभापती निवडीत विखे पाटीलांचा आदेश नुसार निर्णय घेणार आहे. मी सभापती पदासाठी इच्छुक नाही. - अण्णासाहेब शेलार, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद 

Web Title: Shrigonda Panchayat Committee Chairman, Deputy Chairman, resigns