श्रीगोंदा नगरपालिका : येथे पाहा सविस्तर निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 11:59 IST2019-01-28T11:56:54+5:302019-01-28T11:59:36+5:30

श्रीगोंदा : भाजप व कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या शुभांगी पोटे यांनी विजय मिळविला. भाजपच्या ...

Shrigonda Municipality: See here detailed results | श्रीगोंदा नगरपालिका : येथे पाहा सविस्तर निकाल

श्रीगोंदा नगरपालिका : येथे पाहा सविस्तर निकाल

श्रीगोंदा : भाजप व कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या शुभांगी पोटे यांनी विजय मिळविला. भाजपच्या सुनीता शिंदे यांचा त्यांनी २ हजार १०० मतांनी पराभव केला.
निवडणुकीत भाजपाने ११ जागांवर विजय मिळविला तर आघाडीने 09 जागांवर विजय मिळविला. काल
नगरपालिकेसाठी काल ८४ टक्के मतदान झाले. २३ हजार ६०४ मतदारांपैकी १९ हजार ८५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. श्रीगोंदा नगरपालिकेसाठी १९ जागांसाठी ७१ उमेदवार मैदानात होते. नगराध्यक्षपदासाठी शुभांगी पोटे, सुनीता शिंदे आणि सिराबजी कुरेशी यांच्यात लढत होती.

सविस्तर निकाल : सर्व विजयी उमेदवार
प्रभाग क्रमांक १ -संगीता मखरे, राजूू लोखंडे (आघाडी)
प्रभाग क्रमांक २- सुनीता खेतमाळीस (भाजप), गणेश भोस (आघाडी)
प्रभाग क्रमांक ३-  दीपाली औटी, संग्राम घोडके (भाजप)
प्रभाग क्रमांक ४- मनोहर पोटे (आघाडी), वनिता क्षीरसागर (भाजप)
प्रभाग क्रमांक ५- मनीषा वाळके, शहाजी खेतमाळीस (भाजप)
प्रभाग क्रमांक ६- अशोक खेंडके, मनीषा लांडे (भाजप)
प्रभाग क्रमांक ७ - सोनल घोडके, निसार बेपारी (आघाडी)
प्रभाग क्रमांक ८- ज्योती खेडकर, रमेश लाढाणे (भाजप)
प्रभाग क्रमांक ९- छाया गोरे (भाजप), सीमा गोरे, संतोष कोथिंबिरे (आघाडी).

 

 

Web Title: Shrigonda Municipality: See here detailed results