श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक : ६० उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 18:18 IST2019-01-09T18:17:35+5:302019-01-09T18:18:29+5:30
श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवार ८ जानेवारीअखेर एकूण ६० उमेदवारी अर्ज दाखल झाले.

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक : ६० उमेदवारी अर्ज दाखल
श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवार ८ जानेवारीअखेर एकूण ६० उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात भाजपकडून २८, शिवसेनेकडून १०, राष्ट्रवादीकडून ६, काँग्रेसकडून ५, संभाजी ब्रिगेडकडून २ व अपक्षांकडून ९ अर्ज दाखल झाले आहेत. बुधवार ९ जानेवारी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
प्रभाग क्रमांक एक, चार व पाचमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एबी फॉर्म देताना राजकीय राजकीय उलथापालथी होणार आहेत.
प्रभाग पाचमध्ये उमेदवारीवरून संदीप खामकर, गोरख आळेकर, प्रभाग एकमध्ये उमेदवारीवरून कुमार लोखंडे, राजू लोखंडे, प्रभाग क्रमांक चारमधील उमेदवारीवरून राजेश डांगे तर प्रभाग क्रमांक सहामध्ये सुनीता घोडके, तसेत प्रभाग क्रमांक नऊमध्ये डॉ. सुवर्णा होले, उपनगराध्यक्षा अर्चना गोरे कमालीच्या नाराज आहेत. हे नाराज उमेदवार शेवटच्या टप्यात काय भूमिका घेतात हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे
नाहाटा, दरेकर भाजपमध्ये!
प्रभाग क्रमांक सातमध्ये भाजपकडून बाळासाहेब नाहाटा यांचे बंधू नगरसेवक भारत नाहाटा यांची, तर प्रभाग क्रमांक चारमध्ये राष्ट्रवादीचे नेते प्रा. तुकाराम दरेकर यांचे चिरंजीव संतोष दरेकर यांची उमेदवारी भाजपकडून निश्चित झाली आहे. त्यामुळे तुकाराम दरेकर, बाळासाहेब नाहाटा हे बबनराव पाचपुते यांच्या निवडणूक यंत्रणेत सक्रीय झाले आहेत. बुधवार उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने नगरपालिका परिसराला छावणीचे स्वरूप येणार आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी सचिन आहेर व तहसीलदार महेंद्र महाजन यांनी निवडणूक यंत्रणेला दिल्या आहेत.