श्रीगोंदा बाजारात कांदा गडगडला
By Admin | Updated: March 13, 2016 23:54 IST2016-03-13T23:45:25+5:302016-03-13T23:54:34+5:30
श्रीगोंदा : दुष्काळात कांदा साथ देईल अशी शेतकऱ्यांची आशा फोल ठरली. कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर गडगडले असून किलोचा भाव ६ ते ८ रुपये आहे.

श्रीगोंदा बाजारात कांदा गडगडला
श्रीगोंदा : दुष्काळात कांदा साथ देईल अशी शेतकऱ्यांची आशा फोल ठरली. कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर गडगडले असून किलोचा भाव ६ ते ८ रुपये आहे. त्यामुळे कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत.
श्रीगोंदा कांदा बाजारात आठवड्याला २५० ते २७० मे. टन कांदा आवक होत आहे. दुष्काळीस्थितीमुळे कांदा आवकमध्ये गेल्या वर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणावर घट होत आहे.त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात आहेत. शेतकऱ्यांनी महागाचे कांदा बी रोपे खरेदी करून लागवड केली. दुष्काळात टँकरने विकतचे पाणी घेऊन कांदा जगविला. या पिकासाठी शेतकऱ्यांना एकरी ५० ते ६० हजाराचा खर्च आला. त्यासाठी त्यांनी बँका, सोसायट्या किंवा खासगी सावरकरांचे कर्जही काढले.
कांदा ६ ते ८ रुपये किलो दराने विकला जात असल्याने शेतकऱ्यांचा पिकावरील खर्चही वसूल होत नाही.
(तालुका प्रतिनिधी)