श्री समर्थ पाॅलिटेक्निकची उज्ज्वल निकालाची परंपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:47 IST2021-09-02T04:47:01+5:302021-09-02T04:47:01+5:30
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेमध्ये तृतीय वर्षामध्ये श्रेया जोशी हिने ८७.४१ टक्के गुण मिळून महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तृतीय वर्ष ...

श्री समर्थ पाॅलिटेक्निकची उज्ज्वल निकालाची परंपरा कायम
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेमध्ये तृतीय वर्षामध्ये श्रेया जोशी हिने ८७.४१ टक्के गुण मिळून महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन या शाखेमधील प्रतीक तरटे याने ९१.३५. टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम आला आहे तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग तृतीय वर्षांतील अजहर शेख याने ८५.७४ टक्के मिळवून प्रथम आला आहे. महाविद्यालयातील द्वितीय वर्षांमधील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या विभागांमध्ये श्रुती भुजबळ हिने ८४.२ तसेच प्रथम वर्ष काॅम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये ऋतुजा पवार हिने ८७.२५ गुण मिळवून प्रथम आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन या विभागातील द्वितीय वर्षांमधील पवन अनारसे याने ८०.९० मिळवून प्रथम तर प्रथम वर्षातील प्रफुल्ल बनकर याने ७९.५० टक्के मिळविले आहेत. द्वितीय वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंग या विभागांमध्ये संहिता राईसोनी हिने ८३.२५ व प्रथम वर्ष सिव्हिलमधील शुभम गटणे याने ७८.९५ टक्के मिळविले आहेत. तृतीय वर्ष मेकॅनिकल मधील दर्शन दळवी याने ८५.५५. द्वितीय वर्ष मेकॅनिकल मधील विजय कुलकर्णी ८४.२४ व प्रथम वर्ष मेकॅनिकल मधील संजय वाघमारे यांने ७६.५७ गुण मिळविले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक कैलास गाडीलकर व प्राचार्य भाऊसाहेब अनारसे व सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.