येळपणेत श्री खंडेश्वर कोविड सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:19 IST2021-05-17T04:19:34+5:302021-05-17T04:19:34+5:30
काष्टी : जिल्हा परिषदेचे सदस्य स्व. सदाशिव पाचपुते यांच्या स्मरणार्थ येळपणे येथे ४० बेडचे श्री खंडेश्वर कोविड सेंटर ...

येळपणेत श्री खंडेश्वर कोविड सेंटर सुरू
काष्टी : जिल्हा परिषदेचे सदस्य स्व. सदाशिव पाचपुते यांच्या स्मरणार्थ येळपणे येथे ४० बेडचे श्री खंडेश्वर कोविड सेंटर सुरू करण्यात आले. या सेंटरचे उद्घाटन आमदार बबनराव पाचपुते यांच्या हस्ते करण्यात आले.
बबनराव पाचपुते म्हणाले, कोरोनामुळे मानवाची मोठी हानी झाली. अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाचे उपचार घेण्यासाठी पैसे नाहीत. सामाजिक जाणीवेतून येळपणेत कोविड सेंटर सुरू करण्याचा चांगला निर्णय घेतला.
कोविड सेंटर सुरू होण्यापूर्वी रुग्णांची सेवा करण्यासाठी अडीच लाखाची वर्गणी जमा झाली आहे. काहींनी साहित्यही भेट दिले. कोविड सेंटरवर भोजनावळी देण्यासाठी अनेक अन्नदाते पुढे आले आहेत.
यावेळी उद्योजक सतीश धावडे, डॉ. अजिंक्य गिरमकर, डॉ. अक्षय खामकर, डॉ. चेतन गिरमकर, सरपंच किरण धावडे, मितेश नाहाटा, बाळासाहेब पवार, जितेंद्र धावडे, नवनाथ देवकर, जालिंदर पवार आदी उपस्थित होते.
---
१६ येळपणे