श्रावण सोहळ्यात सखींची धमाल
By Admin | Updated: August 24, 2014 02:05 IST2014-08-24T02:04:37+5:302014-08-24T02:05:55+5:30
अहमदनगर : ‘लोकमत सखी मंच’ आयोजित साईदीप ग्रुप प्रस्तुत व गिफ्ट स्पॉन्सरस एस.जी. कायगावकर ज्वेलर्स यांच्या सहकार्याने ‘‘श्रावण सोहळा’’ लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे पार पडला.

श्रावण सोहळ्यात सखींची धमाल
अहमदनगर : ‘लोकमत सखी मंच’ आयोजित साईदीप ग्रुप प्रस्तुत व गिफ्ट स्पॉन्सरस एस.जी. कायगावकर ज्वेलर्स यांच्या सहकार्याने ‘‘श्रावण सोहळा’’ लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे पार पडला. यावेळी आयोजित उखाणा स्पर्धेत प्रथम- स्नेहल छाजेड, द्वितीय- किर्ती देहरेकर, तृतीय- प्रतिभा सासवडे तर उत्तेजनार्थ- सुरेखा जाजू, रत्ना नवसुपे, वृषाली गायकवाड यांनी बक्षिसे मिळविली तर चारोळी स्पर्धेत प्रथम आशा साठे, द्वितीय- समीक्षा वायकर, तृतीय- सीमा काळे, उत्तेजनार्थ- अश्विनी घोडेकर, कमल ससे, सारिका कोठारी यांनी बक्षिसे मिळविली.
लोकमतचे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नीता फुलारी, संगीता भोसले, वंदना सुदामे, अलका मुंदडा, छाया कर्डिले, परिक्षक शारदा पोखरकर, सुजाता कांबळे आदी सखी उपस्थित होत्या.
सृष्टीच्या सौंदर्याचा अविष्कार असलेला श्रावण सखींनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला. रिमझिम पावसात सखींनी लक्षणीय संख्येने उपस्थित राहून या मन-तनाला चिंब करणाऱ्या सोहळ्याचा आनंद घेतला. या कार्यक्रमात येथील आयएसडीटी कॉलेजच्या विद्यार्थिनींनी फॅशन शो सादर केला. त्यामध्ये त्यांनी मॅजिक ट्युब, महाराष्ट्रीयन तडका, ओरीगामी, वृक्ष वाचवा अशा विविध संकल्पना घेऊन फॅशन शो सादर केला.
उखाणा स्पर्धेत सखींनी आपल्या पतीरायांचे गुणगान गाणारे विविध उखाणे घेतले तसेच श्रावण सोहळ्यासाठी आयोजित या स्पर्धेसाठी खास श्रावणाचे महत्त्व सणवाराचे महत्त्व सांगणारे उखाणेही सखींनी सादर केले.
आय.एस.डी. कॉलेजच्या वतीने दीपाली तेलंग, गौरी देशपांडे, उमेश गंगुल, प्रणोती ससाणे, रूपाली बलदोटा, पूजा गोवर्धन यांनी फॅशन शोचे नियोजन केले. शितल चौधरी, इंदिरा तिवारी, सोनल भांगे, जोत्सना लिमजे या सखींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता गिरवले यांनी केले तर आभार लोकमत सखी मंच संयोजिका नूतन शिंदे यांनी मानले.