दानवेंच्या फलकाची श्रीगोंद्यात गाढवावरुन धिंड

By Admin | Updated: May 15, 2017 20:42 IST2017-05-15T20:42:31+5:302017-05-15T20:42:31+5:30

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या फलकाची गाढव धिंड काढून भाजपाचा निषेध केला.

Shot from donkeys in donkeys | दानवेंच्या फलकाची श्रीगोंद्यात गाढवावरुन धिंड

दानवेंच्या फलकाची श्रीगोंद्यात गाढवावरुन धिंड

आॅनलाईन लोकमत
श्रीगोंदा (अहमदनगर), दि़ १५ - श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी श्रीगोंदा शहरातून शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या फलकाची गाढव धिंड काढून भाजपाचा निषेध केला.
यावेळी राष्ट्रीय युवक कॉंग्रेसचे सचिव हेमंत ओगले म्हणाले, भाजपाच्या जबाबदार व्यक्तीकडून असे महाराष्ट्रतील शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरणे यासारखी लाजीरवाणी गोष्ट नाही. त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी व आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. यावेळी बाळासाहेब मोहरे, सचिन गायकवाड, सुभान तांबोळी, फिरोज जकाते, अस्लम शेख, मुज्जफार मालजाप्ते, गोरख बायकर, दादा साबळे, प्रवीण ढगे, शाहरुख जकाते, सोयब शेख, निलेश सकट, निलेश उबाळे, पोपट गांजुरे, भाऊ डांगे, लाला बारगुजे, संदीप वागसकर आदी युवक काँग्रेसचे कार्यकते यावेळी उपस्थित होते.

Web Title: Shot from donkeys in donkeys