शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग : माहीजळगावमधील सहा दुकाने खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 10:32 IST2018-10-11T10:30:09+5:302018-10-11T10:32:47+5:30

विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत माहीजळगाव(ता.कर्जत) येथील सहा दुकाने जळून खाक झाली.

Short circuit due to fire: Six shops in Mahijalgaon, Khak | शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग : माहीजळगावमधील सहा दुकाने खाक

शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग : माहीजळगावमधील सहा दुकाने खाक

माहीजळगाव : विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत माहीजळगाव(ता.कर्जत) येथील सहा दुकाने जळून खाक झाली. रात्री साडेअकराच्या सुमारास विजेचा सर्किट झाल्याने आगेने पेट घेतला. त्यामध्ये शहाजी इरकर यांचे प्रतीक्षा फोटो स्टुडिओ,अनिल पवार त्यांचे फूटवेअर, मल्लू वाघमोडे यांचे पूजा लेडीज शॉपी, विनोद पावर यांचे साई टेलर्स अँड लॉड्री, सचिन सुरवसे यांचे हेअर सलून, गवारे यांचे कापड दुकान, स्वरांगी मोबाईल शॉपी, संजीवन सपकाळ यांचे पाइप्सचे दुकाने आगीत जाळून खाक झाली.
आगीमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. आग भीषण असल्याने ती आटोक्यात येत नव्हती. माहीजळगाव येथील युवकांनी शथीर्चे प्रयत्न करून आग विझवली.

Web Title: Short circuit due to fire: Six shops in Mahijalgaon, Khak