शॉर्ट सर्किट होऊन डिजिटल बोर्डचे दुकान खाक
By अरुण वाघमोडे | Updated: June 22, 2024 15:43 IST2024-06-22T15:43:04+5:302024-06-22T15:43:10+5:30
शनिवारी दुपारी साडेआकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

शॉर्ट सर्किट होऊन डिजिटल बोर्डचे दुकान खाक
अहमदनगर: शहरातील नगर-मनमाड रोडवरील पत्रकार चौकातील कोहिनूर प्लाझा इमारतीतील डिजिटल बोर्डाच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून संपूर्ण दुकान खाक झाले. शनिवारी दुपारी साडेआकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
सकाळी कर्मचाऱ्याने दुकान उघडून कामकामज सुरू केले होते. साडेआकरा वाजेच्या सुमारास दुकानाच्या मागील बाजूने शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागली. काही वेळातच आगीने भडका घेऊन संपूर्ण दुकानात आग पसरली. यावेळी महापलिकेच्या अग्नीशमन विभागाला माहिती देण्यात आली तेव्हा अग्नीशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र, तोपर्यंत संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.
अग्नीशमन बंबातून पाणी मारल्यानंतर ही आग आटोक्यात आली. दरम्यान कोहिनूर प्लाझा इमारतीत अनेक दुकाने आहेत. तातडीने आग विझविण्यात आल्याने ही आग इतरत्र पसरली नाही. या घटनेत दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य खाक झाल्याचे दुकान मालकाने सांगितले.