अहमदनगर शहरातील दुकाने उघडली; रस्त्यावर गर्दी, रुग्ण संख्या घटली, जिल्ह्यात 530 रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 12:45 IST2021-06-07T12:44:35+5:302021-06-07T12:45:19+5:30
अहमदनगर : जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी अनलॉलचा आदेश जारी केल्यानंतर सोमवारी सकाळपासूनच नगर शहरातील सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना उघडण्यात आली. सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने नियमित सुरू केली असून या दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी ग्राहकांची ही गर्दी सुरू झाली आहे.

अहमदनगर शहरातील दुकाने उघडली; रस्त्यावर गर्दी, रुग्ण संख्या घटली, जिल्ह्यात 530 रुग्ण
अहमदनगर : जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी अनलॉलचा आदेश जारी केल्यानंतर सोमवारी सकाळपासूनच नगर शहरातील सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना उघडण्यात आली. सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने नियमित सुरू केली असून या दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी ग्राहकांची ही गर्दी सुरू झाली आहे.
अहमदनगर शहरातील बाजार समिती परिसरातही भाजी विक्रीसाठी आज मोठी गर्दी होती. तसेच नगर शहरातील पाइपलाइन रोड, चितळे रोड, बालिकाश्रम रोड, भिस्तबाग नाका, वाडियापार्क आदी भागांमध्ये भाजीविक्रेत्यांचीही गर्दी दिसून आली. ग्राहकांनी मुक्तपणे खरेदीचा आस्वाद घेतला. दरम्यान कोणतेही निर्बंध नसल्याने नगर शहरातही रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वर्दळ होती. तसेच नेहमीप्रमाणे आजही पहिल्याच दिवशी ट्रॅफिक जाम झाल्याचे बघायला मिळाले. दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करून व्यवहार करावेत, असे आवाहन केले आहे. दरम्यान शहरातील व्यापाऱ्यांनी मास्क वापरणाऱ्या ग्राहकांनाच दुकानात प्रवेश देण्याबाबत सक्ती केली आहे. तसे दुकानाबाहेर सॅनिटायझर ठेवण्यात आले असून सामाजिक अंतराचे नियम पाळण्याबाबत ही दुकानदार आग्रही असल्याचे दिसते.
दरम्यान सोमवारी दुपारी संपलेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यामध्ये 530 तर अहमदनगर शहरामध्ये 34 रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन दिवसांत नंतर शनिवारी आणि रविवारी कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती ती सोमवारी परत कमी झाल्याचे दिसते आहे.