खंडाळा येथे छपरास तर रांजणखोलला दुकानाला आग

By Admin | Updated: November 3, 2016 01:06 IST2016-11-03T00:45:38+5:302016-11-03T01:06:42+5:30

श्रीरामपूर : तालुक्यातील खंडाळा येथे शेतातील छपरास तर नजीकच्या राहाता तालुक्यातील रांजणखोल येथील फर्निचर दुकानास आग लागून शेतकरी व दुकानदाराचे मोठे नुकसान झाले आहे.

A shop in Khandala opened fire at the Chhapras and the shops in Ranjhaol opened | खंडाळा येथे छपरास तर रांजणखोलला दुकानाला आग

खंडाळा येथे छपरास तर रांजणखोलला दुकानाला आग


श्रीरामपूर : तालुक्यातील खंडाळा येथे शेतातील छपरास तर नजीकच्या राहाता तालुक्यातील रांजणखोल येथील फर्निचर दुकानास आग लागून शेतकरी व दुकानदाराचे मोठे नुकसान झाले आहे.
खंडाळा येथील शेतकरी गंगाधर तुकाराम सदाफळ यांच्या राहत्या घराच्या छपरास अचानक आग लागली. छपरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. शेजारी राहत असलेल्या लोकांनी व नागरिकांनी पाणी मारुन आग आटोक्यात आणली. सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान किसन अभंग यांनी शेतात सोयाबीनची कापणी करुन गंजी लावलेल्या सोयाबीनला अचानक आग लागून आगीतून लोळ बाहेर पडत होते. अडीच एकरातील सोयाबीन पीक व तयार झालेले २० पोते सोयाबीनचे नुकसान झाले. वरील दोन्ही घटनामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
रांजणखोल शिवारातील श्रीरामपूर- संगमनेर रस्त्यालगत परिबाबा दर्ग्याजवळ असलेल्या शिवशक्ती स्टील फर्निचर या दुकानास आग लागल्याने आगीत ग्रार्इंडर, वेल्डींग मशीन, कटर, इलेक्ट्रीक मोटार, ड्रील मशीन, कलर डबे असल्याने आगीत भडका घेऊन दुकानातील सर्व माल जळाल्याने फक्त सांगडे दिसत होते.

Web Title: A shop in Khandala opened fire at the Chhapras and the shops in Ranjhaol opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.