दानवे यांच्या फोटोला मारले जोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:34 IST2020-12-13T04:34:52+5:302020-12-13T04:34:52+5:30
शिवसेनेचे तालुका प्रमुख जर्नादन आहेर, शहरप्रमुख अमर कतारी, उपशहर प्रमुख पप्पू कानकाटे, इम्तियाज शेख, माजी नगरसेवक लखन घोरपडे, ...

दानवे यांच्या फोटोला मारले जोडे
शिवसेनेचे तालुका प्रमुख जर्नादन आहेर, शहरप्रमुख अमर कतारी, उपशहर प्रमुख पप्पू कानकाटे, इम्तियाज शेख, माजी नगरसेवक लखन घोरपडे, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख सुरेखा गुंजाळ, शहरप्रमुख संगीता गायकवाड, युवासेनेचे जिल्हा प्रमुख अमित चव्हाण, माजी जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कांदळकर, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, संभव लोढा, प्रथमेश बेल्हेकर, राजू सातपुते, भाऊसाहेब हासे, दीपक साळुंखे, संतोष कुटे, ब्रम्हा खिडके, फैजल सय्यद आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी दानवेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
नेहमीच द्वेषपूर्वक विधान करणाऱ्या दानवेंचा निषेध करण्याचे आदेश शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी दिले होते. त्यानुसार संगमनेरात शिवसेनेच्या वतीने दानवेंच्या फोटोलो जोडे मारो आंदोलन करण्यात आले, असे शहरप्रमुख कतारी यांनी सांगितले.
-------
फोटो नेम : १२ दानवे
ओळ : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या फोटोला जोडे मारताना संगमनेरातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते.