टँकर चालकाच्या श्रीमुखात भडकावली
By Admin | Updated: April 23, 2016 00:56 IST2016-04-23T00:35:56+5:302016-04-23T00:56:16+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिकेमार्फत पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या एका टँकर चालकाच्या श्रीमुखात लगावल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.

टँकर चालकाच्या श्रीमुखात भडकावली
श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिकेमार्फत पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या एका टँकर चालकाच्या श्रीमुखात लगावल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेच्या निषेधार्थ टँकर चालकांनी शनिवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. टँकर चालताना रस्त्यावर धुरळा उडतो, अशी तक्रार करुन एका नागरिकाने अप्पा मडके या टँकर चालकाच्या श्रीमुखात भडकावली होती. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी शुक्रवारी रात्री कुकडीचे कार्यकारी अभियंता सुभाष कोळी यांची भेट घेतली.