धक्कादायक : दुष्काळाला कंटाळून महिलेने संपविली जीवनयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 19:15 IST2019-05-09T19:14:22+5:302019-05-09T19:15:02+5:30
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील संगीता अशोक फसले (वय ४२ वर्ष ) या महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

धक्कादायक : दुष्काळाला कंटाळून महिलेने संपविली जीवनयात्रा
चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील संगीता अशोक फसले (वय ४२ वर्ष ) या महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. उपजीवीका चालविण्यासाठी मोलमजुरी करून प्रपंच चालवितांना आर्थिक अडचणीना कंटाळून महिलेने आपली जीवनयात्रा संपवली.
दुष्काळी परिस्थितीमुळे काम मिळत नसल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली होती. मुलाचे डी.एड. पूर्ण असून तोही बेरोजगार होता. पती मोलमजुरीवर अवलंबून आहे. पण यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत मजुरी मिळत नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ येत होती. या सर्व भयानक परिस्थितीला कंटाळून संगीता फसले यांनी जीवनयात्रा संपवली. नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद झाली असून पोलीस हवालदार बापुसाहेब फोलाने पुढील तपास करत आहेत.