धक्कादायक : ‘त्या’ चिमुरडीचा मृतदेह सापडला विहिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:21 IST2021-02-16T04:21:05+5:302021-02-16T04:21:05+5:30

राहुरी : तालुक्यातील ब्राह्मणी गावात ऊस तोडणी कामगाराच्या बेपत्ता साडेचार वर्षीय मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी विहिरीत सापडला आहे. ...

Shocking: The body of 'that' Chimurdi was found in the well | धक्कादायक : ‘त्या’ चिमुरडीचा मृतदेह सापडला विहिरीत

धक्कादायक : ‘त्या’ चिमुरडीचा मृतदेह सापडला विहिरीत

राहुरी : तालुक्यातील ब्राह्मणी गावात ऊस तोडणी कामगाराच्या बेपत्ता साडेचार वर्षीय मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी विहिरीत सापडला आहे. ब्राह्मणी-जुना वांबोरी रस्त्यालगत ऊस तोडणी कामगारांची वस्ती आहे. या वस्तीपासून एक हजार मीटरवर असलेल्या विहिरीमध्ये बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी दिली.

शुक्रवारी मध्यरात्रीपासून ही मुलगी ऊस तोडणी कामगारांच्या झोपडीतून बेपत्ता होती. शनिवारी कुटुंबियांनी दिवसभर तिचा शोध घेतला. मात्र, शोध लागला नव्हता. अखेर शनिवारी सायंकाळी पोलीस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी सकाळपासून श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्यासह नगरमधील शीघ्र कृती दलाच्या पथकाकडून मुलीचा शोध घेतला जात होता.

दरम्यान, सोमवारी सकाळी ब्राम्हणी गावातच वांबोरी रस्त्यालगतच्या एका विहिरीत बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडला.

Web Title: Shocking: The body of 'that' Chimurdi was found in the well