नगर-औरंगाबाद महामार्गावर शिवशाही पलटी, १५ प्रवाशी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 17:09 IST2019-07-31T17:09:01+5:302019-07-31T17:09:29+5:30
नगर- औरंगाबाद महामार्गावर माळीचिंचोरा फाट्याजवळ पुणे- औरंगाबाद शिवशाही पलटी झाल्याने दहा ते पंधरा प्रवाशी जखमी झाले असून त्यांना नेवासा फाटा येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

नगर-औरंगाबाद महामार्गावर शिवशाही पलटी, १५ प्रवाशी जखमी
नेवासा : नगर- औरंगाबाद महामार्गावर माळीचिंचोरा फाट्याजवळ पुणे- औरंगाबाद शिवशाही पलटी झाल्याने दहा ते पंधरा प्रवाशी जखमी झाले असून त्यांना नेवासा फाटा येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
माळीचिंचोरा फाट्याजवळ दुपारी चारच्या दरम्यान समोरील गाडीने अचानक ब्रेक दाबल्याने पुण्याहून औरंगाबादकडे जाणारी शिवशाही बस (एम. एच.०४ जे.के. २८४१) च्या चालकाचा बस वरील ताबा सुटून दुभाजक ओलांडून नगर कडे जाणा-या रस्त्यावर पलटी झाली. नागरिकांनी व पोलिसांनी तात्काळ जखमींना बसच्या बाहेर काढून नेवासा फाटा येथील खाजगी व ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती बीट अंमलदार सुनील जरे यांनी दिली. यावेळी महामार्गावर दुतर्फा मोठी गर्दी झाल्याने वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.