दिवगंत संजय कोतकर यांच्या पत्नीस शिवसेनेनं शहराची आमदारकी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 16:00 IST2018-05-25T14:39:30+5:302018-05-25T16:00:18+5:30
शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर यांची केडगावात हत्या झाली. त्यांच्या हत्येनंतर राजकिय पोळी भाजण्याचे धंदे बंद करावेत.

दिवगंत संजय कोतकर यांच्या पत्नीस शिवसेनेनं शहराची आमदारकी द्यावी
अहमदनगर : शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर यांची केडगावात हत्या झाली. त्यांच्या हत्येनंतर राजकिय पोळी भाजण्याचे सुरु असणारे धंदे बंद करावेत. चौकात बोर्ड लावून श्रध्दांजली वाहण्यापेक्षा कोतकर यांच्या पत्नीस नगर शहराची आमदारकी शिवसेनेनं द्यावी. त्यानंतरच कोतकर कुटुबियांना न्याय मिळेल, असे मत नगर तालुका शिवसेनेचे माजी प्रमुख श्रीराम येंडे यांनी व्यक्त केले आहे. प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी ही भुमिका मांडली आहे.
पत्रकात येंडे यांनी यासाठी विविध दाखले दिले आहेत. २०१९ मध्ये होणा-या विधानसभेच्या निवडणुकीत कोतकर यांच्या पत्नीस शिवसेनेनं उमेदवारी देत आमदार करण्याची मागणी शिवसैनिकांची असल्याचे येंडे यांनी म्हटले आहे. अहमदनगर शहरातील वॉर्ड क्र. २ मधील अशोक भांगरे यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक झाली. त्यांच्या जागेवर पत्नीला उमेदवारी दिली.येणा-या २०१९ निवडणुकीत नगर शहरातील शिवसेनेनं आमदारीकीचे तिकिट संजय कोतकर यांच्या पत्नीला मिळावे. त्यानंतर कोतकर कुटुबियांना न्याय द्यावा.