शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'शिवसेना भाजपाची 'प्रेयसी', प्रेयसीचं भांडण कधी चांगलं तर कधी बिघडलेलं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 22:47 IST

पत्रकारांशी बोलताना त्यांनी आगामी निवडणुकांबद्दल भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसकडून आम्हाला 12 जागा हव्या आहेत.

मुंबई - भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनाभाजपा युतीवरुन शिवसेनेला टोला लागवला आहे. शिवसेना ही भाजपाची प्रेयसी असल्यामुळे हे संबंध तुटत नाहीत. प्रेयसीचं भांडण हे कधी चांगल तर कधी बिघडलेलं असतं, असे म्हणत शिवसेना-भाजपा युती होईल, असे संकेत प्रकाश आंबेडकर यांनी दिली. तर, युती झाल्यास त्याचा फायदा आम्हालाच होईल, असेही ते म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकरांचा राज्यभर दौरा सुरू आहे. गुरुवारी अहमदनगरमधील शिर्डी येथे

पत्रकारांशी बोलताना त्यांनी आगामी निवडणुकांबद्दल भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसकडून आम्हाला 12 जागा हव्या आहेत. जर, काँग्रेसने 12 जागा दिल्या तर आम्ही महाआघाडीसोबत जाऊ, अन्यथा 48 जागांवर उमेदवार उभे करू, असेही आंबेडकर यांनी म्हटलंय. शरद पवार हे पुरोगामी असले तरी त्यांचा पक्ष प्रतिगामी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष संभाजी भिडे चालवत असल्याचा घणाघाती आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केलाय. त्यामुळे आघाडी झाल्यास आम्ही केवळ काँग्रेसचा प्रचार करू, राष्ट्रवादीचा प्रचार काँग्रेस करेल, असेही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलंय.

भाजपा-शिवसेना युतीबाबत बोलताना, भाजपा आणि शिवसेनेला त्यांनी प्रियकर आणि प्रेयसीची उमपा दिलीय. शिवसेना ही भाजपाची प्रेयसी असून ते भांडण कधी लाडाच तर कधी बिघडलेलं असतं. त्यामुळे दोघांची युती होईलच, असे संकेतही त्यांनी दिले. मात्र, सेना-भाजपाची युती झाल्यास फायदा आम्हालाच होईल, असेही सांगायला ते विसरले नाहीत.  

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरShiv SenaशिवसेनाBJPभाजपाElectionनिवडणूक 2024