नेवासा बाजार समितीच्या सभापतीपदी शिवाजी शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:20 IST2021-03-10T04:20:58+5:302021-03-10T04:20:58+5:30
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली व मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचे कामकाज सुरू आहे. सभापती कडूबाळ ...

नेवासा बाजार समितीच्या सभापतीपदी शिवाजी शिंदे
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली व मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचे कामकाज सुरू आहे. सभापती कडूबाळ कर्डिले यांची मुळा सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. यामुळे बाजार समितीचे सभापतीपद रिक्त झाले होते. या रिक्त पदाची निवड प्रक्रिया अहमदनगर येथील उपनिबंधक एस. एल. रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली. डॉ. शिवाजी शिंदे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड यावेळी करण्यात आली.
यावेळी मावळते सभापती कर्डिले यांनी सभापती पदासाठी डॉ. शिवाजी शिंदे यांच्या नावाची सूचना मांडली. त्यास संचालक चंद्रकांत जाधव यांनी अनुमोदन दिले.
यावेळी ज्येष्ठ नेते विश्वासराव गडाख यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती शिंदे यांचा सत्कार केला. याप्रसंगी मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, संचालक जबाजी फाटके, नारायण लोखंडे, पंचायत समितीचे उपसभापती किशोर जोजार, दादासाहेब निपुंगे, अशोक जेम्स यावेळी उपस्थित होते.