श्रीगोंदा तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:39 IST2021-02-21T04:39:40+5:302021-02-21T04:39:40+5:30
श्रीगोंदा : शहरासह तालुक्यात लिंपणगाव, लोणी व्यंकनाथ, बेलवंडी, कोळगाव, अजनूज, पेडगाव, आढळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे ...

श्रीगोंदा तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी
श्रीगोंदा : शहरासह तालुक्यात लिंपणगाव, लोणी व्यंकनाथ, बेलवंडी, कोळगाव, अजनूज, पेडगाव, आढळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
श्रीगोंदा येथे शिवजयंतीनिमित्त राष्ट्रपुरुषांच्या विचारांचा सप्ताह आयोजित केला होता. या सप्ताहात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, प्रा. गणेश फरतळे, प्रा. संदीप थोरात, प्रा. दिनेश मुरकुटे, नवाज शेख, प्रशांत खामकर, प्रा. दिनेश पाटील, प्रदीप सांळुके, आदींची व्याख्याने झाली. लोणी व्यंकनाथ येथे सरपंच रामदास ठोंबरे, बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा, गणपतराव काकडे, लालासाहेब काकडे, शिवाजी जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. श्रीगोंदा फॅक्टरी येथे जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे, सरपंच शुभांगी सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, काका रोडे यांनी पुष्पहार अर्पण केला.
---
२० श्रीगोंदा जयंती
लोणी व्यंकनाथ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.