माऊंट सिनाय स्कूलमध्ये शिवजयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:00 IST2021-02-20T05:00:05+5:302021-02-20T05:00:05+5:30
प्रारंभी छत्रपतींच्या तैलचित्रास प्रमुख पाहुणे टाकळी काझीचे सरपंच शहाजी आटोळे व कोल्हेवाडी गावच्या सरपंच मनिषा कुटे यांच्या हस्ते ...

माऊंट सिनाय स्कूलमध्ये शिवजयंती साजरी
प्रारंभी छत्रपतींच्या तैलचित्रास प्रमुख पाहुणे टाकळी काझीचे सरपंच शहाजी आटोळे व कोल्हेवाडी गावच्या सरपंच मनिषा कुटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थी विश्वास बनकर, साईराज कावरे, अरुण चव्हाण, मोनिका रामकुमार, अनुज मडीवालर व आराध्या बनिया यांची भाषणे झाली. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आटोळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून मार्गक्रमण करावे असा सल्ला दिला. तसेच कुटे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापिका जयश्री खरात, पांडुरंग पानगे, अशोक ढगे, अशोक आर. ढगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिमा ठोंबरे यांनी केले. आभार रेणुका बनिया यांनी मानले.
-----------
फोटो - १९माऊंट सिनाय
टाकळी काझी येथील माऊंट सिनाय स्कूलमध्ये उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.