माळवाडगावात शिवजयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:40 IST2021-02-21T04:40:24+5:302021-02-21T04:40:24+5:30

गाळे मार्केट विविध संघटना, शिवप्रेमींनी शिवजयंती उत्साहात साजरी केली. बाजीराव आसने यांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले. खासदार गोविंदराव आदिक ...

Shiva Jayanti celebrations in Malwadgaon | माळवाडगावात शिवजयंती उत्साहात साजरी

माळवाडगावात शिवजयंती उत्साहात साजरी

गाळे मार्केट विविध संघटना, शिवप्रेमींनी शिवजयंती उत्साहात साजरी केली. बाजीराव आसने यांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले. खासदार गोविंदराव आदिक शिक्षण संस्थेत शिवजयंती मुख्याध्यापक गंगाधर नाईक यांच्या उपस्थितीत तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवजयंती मुख्याध्यापक कचेश्वर जठार यांच्या अध्यक्षतेखाली साजरी झाली. कार्यक्रमास सरपंच बाबासाहेब चिडे, गिरीधर आसने, सुदामराव आसने, भास्करराव आसने, सुरेश आसने, उत्तमराव आसने बाळासाहेब हुरुळे, शरद आसने, नानासाहेब आसने, सतीश आसने, गोरख दळे, दिलीप हुरुळे, पाराजी दळे, श्रीकांत दळे, सदस्य बबन आसने, संजय आसने, रावसाहेब काळे, अनिल आसने, बाबासाहेब आसने, अशोक खताळ, सुनील शिंदे, प्रदीप आसने, मुकुंद कलांगडे, अशिफ शेख, सुनील पाचपिंड, अविनाश आसने, विठ्ठल कावरे, बाबुराव दळे, बाबासाहेब आसने, राजेंद्र आदिक, बाळासाहेब आसने, विठ्ठल आसने, योगेश आसने, अनिल चौधरी, पत्रकार विठ्ठलराव आसने, संदीप आसने, इब्राम शेख, संजय बाबर, मंगेश साळवे, किरण चोरमले, वैभव आढाव आदी उपस्थित होते. बाळासाहेब हुरुळे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर यावेळी माहिती दिली.

............................................

छावाने केला माजी सैनिकांचा सन्मान

शिवजयंतीनिमित्त उपक्रम : पाणपोईचेही केले उद्‌घाटन

श्रीरामपूर : अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या माजी सैनिकांचा सत्कार करून छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वाटसरूंच्या सोयीसाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांच्या हस्ते पाणपोईचेही उद्घाटन करण्यात आले.

छावाच्या वतीने शहरातील बेलापूर रोड छावा शाखेच्या जवळ छत्रपती संभाजी महाराज उद्यानात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. देशासाठी प्राणांची बाजी लावून लढलेल्या माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. त्यांना शिवप्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर. डी. भोसले होते. यावेळी आमदार लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अरूण पाटील नाईक, नगरसेवक रवी पाटील, रितेश रोटे, प्रवीण फरगडे, संजय गांगड, छावाचे बहिरनाथ गोरे, सुभाष जंगले, जिल्हाध्यक्ष नितीन पटारे आदी उपस्थित होते. प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील यांनीही कार्यक्रमास भेट देऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. माजी सैनिक मेजर संग्राम यादव, छायाताई मोठे, मेजर कृष्णा सरदार, मेजर अनिल लगड, मेजर वाणी, मेजर अस्लम शेख, मेजर सय्यद, मेजर बद्रिनाथ देशमुख या सैनिकांचा अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने शिवप्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.

जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, नीलेश बनकर, शरद बोंबले, विजय बडाख, मनोज होड, राजेंद्र सोनवणे, गोरख शेजूळ, अनिल लबडे, गणेश बोंबले, सुनील लबडे, अक्षय पटारे यांंनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

२० छावा

Web Title: Shiva Jayanti celebrations in Malwadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.