कोपरगावात शिवजयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:20 IST2021-04-02T04:20:03+5:302021-04-02T04:20:03+5:30

कोपरगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे शिवजन्मोत्सव निमित्त कोपरगाव शिवसेनेकडून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावर ...

Shiva Jayanti celebration in Kopargaon | कोपरगावात शिवजयंती साजरी

कोपरगावात शिवजयंती साजरी

कोपरगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे शिवजन्मोत्सव निमित्त कोपरगाव शिवसेनेकडून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावर पहाटे सहा वाजता पाच जोडप्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. रिक्षा स्टँड येथे शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिस्त पुतळ्याला फुलांची आरास करून अतिशय सुंदर पद्धतीने सजविण्यात आले होते.

शहर पोलिसांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे, शिवसेना उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल, माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव, अस्लम शेख, सुनील तिवारी, दिलीप अरगडे, दिलीप सोनवणे, प्रफुल्ल शिंगाडे, विकास शर्मा, गगन हाडा, विक्रांत झावरे, नितीन शिंदे, बाळासाहेब साळुंके, नितीन राऊत, राहुल हंस्वाल, पप्पू पेकळे, अविनाश धोक्रट, किरण कुऱ्हे, राकेश वाघ, जाफर सय्यद, सतीश शिंगाणे, अविनाश वाघ, बंटी बाविस्कर, अंबादास वाघ, प्रवीण शेलार, अशोक पवार, उमेश छुगानी, सतीश खर्डे, भूषण वडांगळे, विशाल झावरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Shiva Jayanti celebration in Kopargaon