सव्वाशे वर्षांनी ‘त्या’ठिकाणी पुन्हा शिवजयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:40 IST2021-02-21T04:40:11+5:302021-02-21T04:40:11+5:30

अहमदनगर शहरात भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल येथे असणारे छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचे स्मृतिस्थळ शिवाजी मंदिर म्हणून संबोधले जाते. २५ डिसेंबर ...

Shiva Jayanti again at that place after one and a half hundred years | सव्वाशे वर्षांनी ‘त्या’ठिकाणी पुन्हा शिवजयंती

सव्वाशे वर्षांनी ‘त्या’ठिकाणी पुन्हा शिवजयंती

अहमदनगर शहरात भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल येथे असणारे छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचे स्मृतिस्थळ शिवाजी मंदिर म्हणून संबोधले जाते. २५ डिसेंबर १८८३ रोजी छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचा खून अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात ब्रिटिशांनी केला. त्यावेळी तत्कालीन कोर्ट असलेल्या व सध्याच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल प्रांगणात शासकीय इतमामात त्यांना अग्नी दिला गेला. त्याठिकाणी त्यांची मंदिरवजा स्मृतिस्थळ उभारणी सुरू केली; परंतु ब्रिटिशांनी त्यात निर्बंध लादले. पुढे १८९७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवउत्सव साजरा केला गेला आणि आयोजकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला; परंतु यंदा स्मायलिंग संघटनेने पुढाकार घेतल्याने याच ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली.

संघटनेकडून गेल्या १२ वर्षांपासून लालटाकी रोड येथील क्रांतिवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथून शिवजयंतीनिमित्त बैलगाडी मिरवणूक काढण्यात यायची; परंतु यंदा कोरोनामुळे ती रद्द करून त्याऐवजी फिरोदिया हायस्कूल प्रांगणातील शिवाजी मंदिरात शिवजयंती साजरी करण्यात आली.

यावेळी पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, नगरसेवक बाळासाहेब पवार, संपूर्णा सावंत, श्रीपाद दगडे, स्मायलिंग अस्मिताचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल, हेमंतराव मुळे, विशाल म्हस्के, श्रेयस सावंत आदी उपस्थित होते.

----------

फोटो - २०स्मायलिंग

स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या वतीने फिरोदिया हायस्कूल प्रांगणातील शिवाजी मंदिरात शिवजयंती साजरी करण्यात आली.

Web Title: Shiva Jayanti again at that place after one and a half hundred years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.