शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:25 IST2021-07-14T04:25:06+5:302021-07-14T04:25:06+5:30
संगमनेर : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार १२ ते २४ जुलै दरम्यान राज्यात शिवसंपर्क अभियान राबविण्यात ...

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात
संगमनेर : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार १२ ते २४ जुलै दरम्यान राज्यात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून सोमवारी (दि.१२) येथील श्रमिक मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी पक्षसंघटन वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले.
तुमसर मोहाडीचे (जि. भंडारा) संपर्क प्रमुख नरेश माळवे, श्रमिक उद्योग समूहाचे संचालक साहेबराव नवले, उपजिल्हा प्रमुख अप्पाशेठ केसेकर, संगमनेर तालुका प्रमुख जर्नादन आहेर, उपतालुकाप्रमुख दत्तू नाईक, शहरप्रमुख अमर कतारी, उपशहर प्रमुख विकास डमाळे, पप्पू कानकाटे, इम्तियाज शेख, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, महिला आघाडीच्या संगमनेर तालुका प्रमुख शीतल हासे, माजी जिल्हा प्रमुख जयवंत पवार, शरदनाना थोरात, विधानसभा संघटक ॲड. दिलीप साळगट, माजी नगरसेवक लखन घोरपडे, युवासेना तालुकाप्रमुख गुलाबराव भोसले, शहरप्रमुख अमोल डुकरे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष संपर्क समन्वयक प्रथमेश बेल्हेकर, रंगनाथ फटांगरे, दिनेश फटांगरे, अमोल कवडे, अमित नवले, रमेश काळे, दीपक वन्नम, सुरेखा गुंजाळ, संतोष वनवे, कावेरी नवले, वनिता जगदाळे, वैभव अभंग, संभव लोढा, भीमा पावसे, सदाशिव हासे, रामभाऊ रहाणे, श्याम रहाणे, योगेश खेमनर, ब्रम्हा खिडके, प्रवीण चव्हाण, नितीन हासे, फैजल सय्यद, सचिन साळवे, गणेश पर्बत, संकेत कोल्हे, संतोष कुटे, राजू सातपुते, विजय सातपुते, रविंद्र गिरी, बाळासाहेब राऊत, प्रमोद कुलट आदी उपस्थित होते.