इंधन भाववाढीविरोधात श्रीगोंद्यात शिवसेनेची सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:38 IST2021-02-06T04:38:39+5:302021-02-06T04:38:39+5:30
श्रीगोंदा : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ श्रीगोंदा येथे शिवसेनेने शुक्रवारी सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी ...

इंधन भाववाढीविरोधात श्रीगोंद्यात शिवसेनेची सायकल रॅली
श्रीगोंदा : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ श्रीगोंदा येथे शिवसेनेने शुक्रवारी सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध केला.
यावेळी अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांना निवेदन देण्यात आले.
शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब दुतारे म्हणाले, केंद्र सरकारने गॅस, डिझेल, पेट्रोल दरवाढ करून महागाईचा भडका उडवून दिला आहे. त्यामुळे ‘अच्छे दिन’च्या गप्पा मारण्याचा अधिकार राहिला नाही.
नंदकुमार ताडे म्हणाले, इंधनाचे भाव एवढे वाढले आहेत. महिलांना पुन्हा चूल पेटविण्याची वेळ येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख संतोष खेतमाळीस, हरिभाऊ काळे, संतोष शिंदे, सुरेश देशमुख, नवनाथ पवार, ओमकार शिंदे, अनिल सुपेकर, शिवाजी दांगडे, संभाजी घोडके, दादासाहेब ढगे, जयराजे गोरे, संतोष चिखलठाणे, योगेश भुतकर, अनिकेत परदेशी उपस्थित होते.
फोटो : ०५ श्रीगोंदा शिवसेना
श्रीगोंदा येथे इंधन दरवाढीविरोधात शिवसेनाच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली होती.