शिवसेना विचारणार जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:18 IST2021-01-17T04:18:09+5:302021-01-17T04:18:09+5:30

शिवसेना नेते कमलाकर कोते, तालुका प्रमुख संजय शिंदे, शहर प्रमुख सचिन कोते, माजी उपनगराध्यक्ष विजयराव जगताप, शहर संघटक अमोल ...

Shiv Sena will ask Jab | शिवसेना विचारणार जाब

शिवसेना विचारणार जाब

शिवसेना नेते कमलाकर कोते, तालुका प्रमुख संजय शिंदे, शहर प्रमुख सचिन कोते, माजी उपनगराध्यक्ष विजयराव जगताप, शहर संघटक अमोल गायके यांनी हा इशारा दिला आहे.

शिर्डी येथील विविध सहकारी सोसायटीस आम्ही सर्वांनी सातत्याने मदत केलेली आहे. सध्या या संस्थेच्या चेअरमनपदी महिला असून, पती सर्व कारभार पाहत आहे. मोठ्या नेत्यांना खूश करण्यासाठी ज्येष्ठांचा अपमान केला जात आहे. ज्येष्ठ नेते सुधाकर शिंदे, दिगंबर शिवराम कोते, अशोक खंडू कोते, माजी विश्वस्त डाॅ. एकनाथ गोंदकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, नगरसेवक अभय शेळके, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिता जगताप, यशवंतराव गायके, भानुदास गोंदकर, शंकरराव बनकर, विलास वाघ यांचे फोटो न छापता व्यक्तिगत रागद्वेष काढीत आहेत. तसेच शिर्डीतील स्थानिकांचे वाद मिटविण्यात अग्रेसर असणारे गंगाभाऊ कोते यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. या गोष्टींचा निषेध शिवसेना करत असून, यासंदर्भात येत्या बैठकीत चेअरमन व संचालक मंडळास शिवसेना स्टाईलने जाब विचारणार आहे. या संदर्भात राज्य शासनाकडे तक्रार करणार असल्याचे शिवसेनेचे पदाधिकारी कमलाकर कोते, संजय शिंदे, सचिन कोते, विजयराव जगताप, अमोल गायके यांनी म्हटले आहे.

Web Title: Shiv Sena will ask Jab