अहिल्यानगरमध्ये ठाकरेसेनेला खिंडार, माजी महापौर, नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार

By सुदाम देशमुख | Updated: January 30, 2025 12:23 IST2025-01-30T12:23:09+5:302025-01-30T12:23:57+5:30

Shiv Sene UBT News: अहिल्यानगर मनपामध्ये आज पर्यंत सर्वात जास्त नगरसेवक, चार महापौर असलेल्या ठाकरे गटाला मात्र आता मोठे खिंडार पडले आहे. ठाकरे गटातील पदाधिकारी यांचा आज गुरुवारी ३० रोजी मुबई येथे शिंदे गटात जाहीर प्रवेश होणार आहे.

Shiv Sena UBT faces defeat in Ahilyanagar, former mayor, corporator, office bearer to join Shinde faction | अहिल्यानगरमध्ये ठाकरेसेनेला खिंडार, माजी महापौर, नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार

अहिल्यानगरमध्ये ठाकरेसेनेला खिंडार, माजी महापौर, नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार

अहिल्यानगरअहिल्यानगर मनपामध्ये आज पर्यंत सर्वात जास्त नगरसेवक, चार महापौर असलेल्या ठाकरे गटाला मात्र आता मोठे खिंडार पडले आहे. ठाकरे गटातील पदाधिकारी यांचा आज गुरुवारी ३० रोजी मुबई येथे शिंदे गटात जाहीर प्रवेश होणार आहे.

आज सकाळीच विद्यमान शहर प्रमुख, माजी महापौर, नगरसेवक, पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून मुबईकडे रवाना झाले. यावेळी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संपर्कप्रमुख दिलीप सातपुते, शहर प्रमुख सचिन जाधव, बाबूशेठ टायरवाले, रणजित परदेशी, रोहित लोखंडे, योगेश गलांडे, अक्षय कातोरे आदी यावेळी उपस्थित होते.


आज शिंदे गटात प्रवेश करणारे
शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर संजय शेडगे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, दत्ता कावरे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, परेश लोखंडे, संतोष गेनपा, संग्राम कोतकर, बबलू शिंदे, विजय पठारे, आदींसह माजी नगरसेवक सुरेश तिवारी, उपशहर प्रमुख संदीप दातरंगे, अरुण झेंडे, रमेश खेडकर, अभिजित अष्टेकर, बंटी खेरे, केलास शिंदे, संतोष तनपुरे, प्रवीण बेद्रे, चेतन शिरसुल, अण्णा घोलप, सागर थोरात, अभिजित दहिहंडे, अनिकेत आरडे, असिफ पटवेकर, ऍड सतीश गीते आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते आज प्रवेश करणार आहेत.

Web Title: Shiv Sena UBT faces defeat in Ahilyanagar, former mayor, corporator, office bearer to join Shinde faction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.