शिवसेना उपतालुकाप्रमुखास धमकावले
By Admin | Updated: August 27, 2014 23:08 IST2014-08-27T22:53:39+5:302014-08-27T23:08:36+5:30
संगमनेर : शिवसेना उपतालुका प्रमुखास पिस्तूलाने धमकावत भाजप कार्यकर्त्याला जबर मारहाण केल्याची घटना धांदरफळ बुद्रुक येथे घडली.

शिवसेना उपतालुकाप्रमुखास धमकावले
संगमनेर : शिवसेना उपतालुका प्रमुखास पिस्तूलाने धमकावत भाजप कार्यकर्त्याला जबर मारहाण केल्याची घटना धांदरफळ बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी तालुका पोलिसांनी उपसरपंचासह ९ ते १० जणांवर शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांची माहिती अशी, भाजप कार्यकर्ता विकास भाऊसाहेब गुळवे हे दुचाकीवरून जात असताना रस्त्यावर साचलेले पावसाचे पाणी सुरेश पांडूरंग खुरपे यांच्या अंगावर उडाल्याने भांडण झाले. दरम्यान सेनेचे उपतालुकाप्रमुख संजय सदाशिव कवडे हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपसरपंच अविनाश गुलाबराव वलवे यांनी कमरेला लावलेले पिस्तूल कवडे यांच्यावर रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच वलवे यांनी लाकडी दांडक्याने विकास गुळवे यांच्या गुडघा, पाय, व डोळ्यावर मारून त्यांना गंभीर जखमी केले. जखमी गुळवे यांच्यावर संगमनेरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी अविनाश वलवे, अभिषेक अशोकराव वलवे, सुरेश खुरपे, पिंटू सुरेश खुरपे व दूध डेअरीतील ४-५ कामगारांविरूध्द शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय भामरे करीत आहेत. (प्रतिनिधी)