शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी घेतले शनी दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:22 IST2021-01-03T04:22:29+5:302021-01-03T04:22:29+5:30
भाविकांनी नवीन वर्षाच्या पहिल्या शनिवारी शिंगणपूरात दर्शनाचा लाभ घेतला. शनिवारी सायंकाळची महाआरती मिलिंद नार्वेकर यांच्या हस्ते झाली. उदासी महाराज ...

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी घेतले शनी दर्शन
भाविकांनी नवीन वर्षाच्या पहिल्या शनिवारी शिंगणपूरात दर्शनाचा लाभ घेतला.
शनिवारी सायंकाळची महाआरती मिलिंद नार्वेकर यांच्या हस्ते झाली. उदासी महाराज मठात नार्वेकर यांनी पत्नी मीरा नार्वेकर यांच्या सोबत शनी अभिषेक केला. नूतन विश्वस्त भागवत बानकर व आप्पासाहेब शेटे यांनी नार्वेकर यांचा शाल, श्रीफळ व शनी प्रतिमा देऊन सन्मान केला. सत्काराला उत्तर देताना मिलिंद नार्वेकर म्हणाले, अनेकदा दर्शनासाठी येत असतो. प्रत्येक वेळेस मोठे समाधान व ऊर्जा मिळत असते. शनी महाराजांचा महिमा संपूर्ण जगात आहे. देशावर कोरोनाचे जे संकट आले आहे ते लवकर दूर होण्यासाठी प्रार्थना केल्याचे ते म्हणाले.
यावेळी विश्वस्त आप्पासाहेब शेटे, भागवत बानकर, जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले, राजेंद्र गुगळे, माजी विश्वस्त योगेश बानकर आदी उपस्थितीत होते.