शिर्डी पोलिसात राणे यांच्याविरोधात शिवसेनेकडून तक्रार;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:26 IST2021-08-25T04:26:20+5:302021-08-25T04:26:20+5:30

शिर्डी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द काढणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, असे पत्र तालुका ...

Shiv Sena lodges complaint against Rane in Shirdi police; | शिर्डी पोलिसात राणे यांच्याविरोधात शिवसेनेकडून तक्रार;

शिर्डी पोलिसात राणे यांच्याविरोधात शिवसेनेकडून तक्रार;

शिर्डी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द काढणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, असे पत्र तालुका शिवसेनेच्यावतीने शिर्डीत पोलिसांना देण्यात आले. शिवसेनेचे नेते कमलाकर कोते, तालुका प्रमुख संजय शिंदे व शहर प्रमुख सचिन कोते, विजय जगताप आदींच्या नेतृत्वाखाली यासंदर्भातील निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी व शिर्डी पोलिसांना देण्यात आले.

यावेळी भास्कर माटेकर, प्रसाद पाटील, सुयोग सावकारे, अक्षय तळेकर, अमोल गायके, साई तनपुरे, दिनेश बहिरट, संतोष कटारे, सागर कटके, संतोष जाधव, साई आण्णा, किशोर सुर्वे आदींची उपस्थिती होती.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेने नारायण राणे यांना मोठे केले, मुख्यमंत्री केले, तेच राणे आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरत आहेत. त्यांना यापुढे शिर्डीत फिरकू देणार नाही, असा इशारा तालुकाप्रमुख संजय शिंदे यांनी दिला.

Web Title: Shiv Sena lodges complaint against Rane in Shirdi police;