शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
2
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
3
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
4
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
5
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
6
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
7
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
8
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
9
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
10
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
11
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
12
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
14
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
15
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
16
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
17
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव
18
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
19
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...

शिवसेनेला ‘अल्टिमेटम’ नाही :रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 12:57 IST

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला कोणताही ‘अल्टिमेटम’ दिलेला नाही. ते वृत्त चुकीचे होते़ शिवसेना भाजपशी युती करेल, अशी आशा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली़

अहमदनगर : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला कोणताही ‘अल्टिमेटम’ दिलेला नाही. ते वृत्त चुकीचे होते़ शिवसेना भाजपशी युती करेल, अशी आशा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली़ भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्ली येथे खासदारांच्या बैठकीत शिवसेनेला युतीसाठी महिनाभराची मुदत दिल्याचं वृत्त माध्यमांनी प्रसारित केले होते़ त्यावर प्रतिक्रिया देताना दानवे यांनी हे स्पष्टीकरण दिले़लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी शुक्रवारी नगर जिल्ह्यातील बूथनिहाय आढावा घेतला़ त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ दानवे म्हणाले, देशात भाजपाविरोधात सर्व राजकीय पक्ष एकत्र येत आहेत़ त्यांनी कितीही तारे तोडले तरी उपयोग होणार नाही़ सर्व विरोधीपक्ष एकत्र आले़ परंतु त्यांनी अद्याप पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही़ पंतप्रधान पदावरून त्यांच्यात भांडणे लागतील़भाजपाविरोधात सर्वच राजकीय पक्षांनी महाआघाडीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे़ मात्र भाजपाचे संघटन देशात मजबूत आहे़ मजबूत संघटनाच्या बळावर नरेंद्र मोदीपुन्हा पंतप्रधान होतील, असे दानवे म्हणाले़भाजपाच्या नेत्यांकडून विभागनिहाय दौरे सुरू आहेत़ कोकण, मराठवाडा, विदर्भातील दौरे पूर्ण झालेले आहेत़ नाशिक विभागाच्या दौऱ्याला नगर जिल्ह्यातून सुरुवात झालेली आहे़ जिल्ह्यातील नगर व शिर्डी मतदारसंघातील बूथनिहाय आढावा घेण्यात येणार असून, अद्याप कुणाचीही उमेदवारी पक्षाने जाहीर केलेली नाही़ उमेदवारीसाठी पक्षाची एक प्रक्रिया असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले़पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यावेळी उपस्थित होते़मोदी पंतप्रधान व्हावेत, ही सेनेचीही इच्छाराज्यात शिवसेना- भाजपाची युती व्हावी, असे आपले मत आहे़ सध्या आम्ही एकत्र आहोत़ नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशी दोन्ही पक्षांची इच्छा असल्याचे दानवे यांनी पत्रकारांना सांगितले़‘त्या’ राष्ट्रवादीवाल्यांसाठी भाजपची दारे खुलीनगर महापालिकेत महापौर निवडणुकीत भाजपाने कुणालाही पाठिंबा मागितला नव्हता़ राष्ट्रवादीकडे पाठिंब्याची मागणी केली नाही़ त्यांनीच बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला़ राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर पक्षाने कारवाई केल्यास त्यांच्यासाठी भाजपाची दारे उघडी आहेत़ शिवसेनेने आमच्याकडे युती करण्याचा प्रस्ताव दिला नाही़ त्यामुळे युतीवर चर्चेचा प्रश्नच नव्हता़ त्यांनी पाठिंबा मागितला असता तर पक्षाने तो दिला असता आणि महापालिकेत युतीची सत्ता स्थापन झाली असती, असेही दानवे यांनी सांगितले़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर