अपघातास कारणीभूत ठरणारा टोल नाका शिवसेनेने तोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:20 IST2021-03-05T04:20:36+5:302021-03-05T04:20:36+5:30
चिचोंडी पाटील : नगर-जामखेड रस्त्यावरील टाकळी काझी येथील मुदत संपलेल्या टोलनाक्यावरील अडथळा निर्माण करणारे बांधकाम गुरुवारी शिवसेना कार्यकर्त्यांनी तोडून ...

अपघातास कारणीभूत ठरणारा टोल नाका शिवसेनेने तोडला
चिचोंडी पाटील : नगर-जामखेड रस्त्यावरील टाकळी काझी येथील मुदत संपलेल्या टोलनाक्यावरील अडथळा निर्माण करणारे बांधकाम गुरुवारी शिवसेना कार्यकर्त्यांनी तोडून टाकले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शिवसेना उपतालुका प्रमुख शंकर ढगे, टाकळीचे उपसरपंच अविनाश ढगे, अशोक ढगे, संभाजी आटोळे, विशाल ढगे, सदाशिव म्हस्के, हेमंत गावडे, हर्षल ढगे, संतोष ढगे उपस्थित होते.
गेल्या काही वर्षांपासून मुदत संपलेल्या टोलनाक्यावरील टोल वसुलीसाठी बनविलेला प्लॅटफॉर्म वाहन चालकांसाठी जीवघेणा ठरत होता. वारंवार घडणाऱ्या छोट्या-मोठ्या अपघातांमुळे टाकळी येथील शिवसैनिकांनी संबंधित टोल नाक्याच्या ठेकेदार संस्थेस संपर्क करून तो काढून टाकण्याची मागणी केली होती. याबाबत त्यांच्याकडून चालढकल होत होती. अखेर शिवसेना कार्यकर्त्यांनी जेसीबीने प्लॅटफॉर्म तोडून हा अडथळा दूर करत नगर-जामखेड मार्गावरील वाहन चालकांचा मार्ग सुखकर बनविला.
---
बुधवारी सकाळीच याच टोलनाक्यावर सरकी घेऊन जाणारा मालट्रक (क्र. एम. एच. ४८, जे ०७१५) उलटला होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे तातडीने टोल नाका तोडण्याचा निर्णय होऊन प्रत्यक्ष प्लॅटफॉर्म नष्ट करण्यात आला.
-अविनाश पवार,
उपसरपंच, टाकळी काझी
---
नगर-जामखेड रस्ता राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे हस्तांतरित झाला. तरीही मुदत संपलेल्या टोलनाक्यावरील प्लॅटफॉर्म मात्र प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत होता. प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रार करूनही त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे. त्यामुळेच गुरुवारी आम्ही हा जीवघेणा अडसर दूर केला.
- संदेश कार्ले,
जिल्हा परिषद सदस्य
---
०४ चिचोंटी टोल, १
नगर-जामखेड रस्त्यावरील टोलनाक्यावरील प्लॅटफार्म जेसीबीच्या सहाय्याने तोडताना शिवसेनेचे कार्यकर्ते. दुसऱ्या छायाचित्रात त्याच परिसरातील अपघातग्रस्त ट्रक.