नगर तालुक्यात शिवसंपर्क अभियानास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:15 IST2021-07-19T04:15:20+5:302021-07-19T04:15:20+5:30
केडगाव : नगर तालुक्यात रविवारी शिवसेना शिवसंपर्क अभियानास प्रारंभ झाला. पंचायत समितीच्या १२ गणांत हे अभियान राबविले जाणार आहे. ...

नगर तालुक्यात शिवसंपर्क अभियानास सुरुवात
केडगाव : नगर तालुक्यात रविवारी शिवसेना शिवसंपर्क अभियानास प्रारंभ झाला. पंचायत समितीच्या १२ गणांत हे अभियान राबविले जाणार आहे. ‘गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक’ या उद्देशातून हे अभियान सुरू आहे.
जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली अभियानास दरेवाडी पंचायत समिती गणातील अरणगावात उपजिल्हाप्रमुख तथा जि. प. सदस्य संदेश कार्ले यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, जि. प. सदस्य शरद झोडगे आदींची भाषणे झाली. पंचायत समिती सभापती सुरेखा संदीप गुंड यांनी पंचायत समितीमधील योजनांची माहिती दिली. उपतालुकाप्रमुख जिवाजी लगड यांनी प्रस्ताविक केले. दरेवाडी शाखाप्रमुख तथा ग्रा. पं. सदस्य भाऊ बेरड यांनी आभार मानले.
यावेळी उपतालुकाप्रमुख सुभाष पुंड, दीपक बेरड, महिला आघाडीच्या भोसले, रंगनाथ शिंदे, बाबा कल्हापुरे, वाकोडीचे माजी सरपंच भाऊसाहेब कराळे, आदिनाथ मोढवे, बुरडगावचे जालू कुलट, दरेवाडीचे ग्रा. पं. सदस्य बाबासाहेब करांडे, एकनाथ ससे, भाऊ बेरड, तुक्कड ओढा शाखाप्रमुख कमलेश करांडे, खंडाळा शाखाप्रमुख बाबासाहेब दरेकर, अरणगाव, खंडाळा, वाकोडी, बुरडगाव, दरेवाडी महिला आघाडी, युवासेना, शिवसेना शाखाप्रमुख आदी उपस्थित होते.
180721\img-20210718-wa0011.jpg
शिव संपर्क अभियान फोटो