ग्रामीण भागातही शिवजयंती जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:30 IST2021-02-26T04:30:24+5:302021-02-26T04:30:24+5:30
तिसगाव : पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील तिसगाव शहर व परिसरातील २५ खेड्यात दिवसभर शिवजयंतीचा जल्लोष सुरू होता. वृद्धेश्वर कारखाना ...

ग्रामीण भागातही शिवजयंती जल्लोष
तिसगाव : पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील तिसगाव शहर व परिसरातील २५ खेड्यात दिवसभर शिवजयंतीचा जल्लोष सुरू होता.
वृद्धेश्वर कारखाना येथे ऊस वाहतूक करणाऱ्या टायर गाड्यांवरही यावर्षी प्रथमच शिवप्रतिमा असलेले झेंडे फडकले. चितळी, कोपरे, कासार पिंपळगाव, निवडुंगे रस्त्यावर सकाळी दहा वाजेपर्यंत हे दृश्य मोठ्या प्रमाणात होते. हनुमान टाकळी येथे खरेदी विक्री संघाचे संचालक सुभाषराव बर्डे, वृद्धेश्वरचे नूतन संचालक कुशीनाथ बर्डे यांचे हस्ते शिवप्रतिमा पूजन झाले. जवखेडे दुमाला येथे सरपंच सचिन नेहुल यांनी शालेय विद्यार्थ्यांना पूरक साहित्यांची भेट दिली. तिसगाव येथे मुख्य बसस्थानकावर सरपंच काशिनाथ लवांडे यांच्या हस्ते शिव पुतळ्याचे पूजन झाले. कासार पिंपळगाव येथे शिव पुतळ्याचे पूजन आमदार मोनिका राजळे व सरपंच मोनाली राजळे यांनी केले.