शिशिरकुमार देशमुख भिंगार तर आठरे एमआयडीसी ठाण्यात नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:22 IST2021-02-16T04:22:47+5:302021-02-16T04:22:47+5:30

पोलीस निरिक्षक विजय करे यांची नियंत्रण कक्षातून नेवासा पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सहायक ...

Shishir Kumar Deshmukh Bhingar and Athare MIDC stationed | शिशिरकुमार देशमुख भिंगार तर आठरे एमआयडीसी ठाण्यात नियुक्त

शिशिरकुमार देशमुख भिंगार तर आठरे एमआयडीसी ठाण्यात नियुक्त

पोलीस निरिक्षक विजय करे यांची नियंत्रण कक्षातून नेवासा पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सहायक निरिक्षक नरेंद्र साबळे यांची राजूर पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोहन बोरसे यांची नियंत्रन कक्षात बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या काही अधिकाऱ्यांनी सोमवारीच संबंधित पोलीस ठाण्यांचा पदभार स्वीकारला.

एलसीबीत देशमुख यांचे कार्य उल्लेखनीय

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रवीण पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने येथील रिक्त जागेवर देशमुख यांची नियुक्ती झाली आहे. देशमुख यांचे स्थानिक गुन्हे शाखेत गेल्या दोन वर्षांत उल्लेखनीय काम राहिले आहे. देशमुख यांच्याकडे एलसीबीचा प्रभारी पदभार होता तेव्हा त्यांनी अवघ्या दीड महिन्यांत गंभीर गुन्हे उघडकिस आणून सराईत आरोपींना जेरबंद केले होते. पुणे व नगरमध्ये शॉपिंग करून दुकानदारांची फसवणूक करणारी टोळी देशमुख यांनी अवघ्या बारा तासांच्या आत जेरबंद केली होती.

Web Title: Shishir Kumar Deshmukh Bhingar and Athare MIDC stationed