केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मंेद्र प्रधान यांचे शनिदर्शन

By Admin | Updated: July 8, 2016 23:35 IST2016-07-08T23:28:33+5:302016-07-08T23:35:08+5:30

सोनई : शनिदेवाचे दर्शन घेतल्याने समाधान वाटले. तसेच येथील विकास कामांमुळे श्रीक्षेत्र शिंगणापूरच्या वैभवात भर पडेल, असे असे प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले.

Shishdarshan of Union Petroleum Minister Dharmendra Pradhan | केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मंेद्र प्रधान यांचे शनिदर्शन

केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मंेद्र प्रधान यांचे शनिदर्शन

सोनई : शनिदेवाचे दर्शन घेतल्याने समाधान वाटले. तसेच येथील विकास कामांमुळे श्रीक्षेत्र शिंगणापूरच्या वैभवात भर पडेल, असे असे प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले.
मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी सहकुटुंब शिंगणापूरला भेट देऊन चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या शिळेचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी महंत उदासी महाराज मठात अभिषेक केला.
शिंगणापूर येथे सुरु असलेल्या विकास कामांविषयी प्रधान यांनी समाधान व्यक्त केले. देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात प्रधान यांचा शनिदेवाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, पुणे येथील भाजपाचे पदाधिकारी राजेश पांडे, नगरसेवक सुवेन्द्र गांधी, देवस्थानच्या अध्यक्षा अनिता शेटे, उपाध्यक्ष नानासाहेब बानकर, विकास बानकर, प्रकाश शेटे, भागवत बानकर, अप्पा शेटे, शालिनी लांडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Shishdarshan of Union Petroleum Minister Dharmendra Pradhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.