कोविड सेंटरमध्ये मुस्लीम समाजाकडून शिरखुर्मा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:19 IST2021-05-16T04:19:22+5:302021-05-16T04:19:22+5:30

सुमनताई ढाकणे कोरोना सेंटरमधील दाखल रुग्णांसाठी रमजान ईदनिमित्त काल सायंकाळी शहरातील मुस्लीम समाजातील कायर्कर्ते नासिर शेख, मौलाना हाफिज अमीन, ...

Shirkhurma distribution from the Muslim community at the Kovid Center | कोविड सेंटरमध्ये मुस्लीम समाजाकडून शिरखुर्मा वाटप

कोविड सेंटरमध्ये मुस्लीम समाजाकडून शिरखुर्मा वाटप

सुमनताई ढाकणे कोरोना सेंटरमधील दाखल रुग्णांसाठी रमजान ईदनिमित्त काल सायंकाळी शहरातील मुस्लीम समाजातील कायर्कर्ते नासिर शेख, मौलाना हाफिज अमीन, अक्रम आतार, लालू शेख, हुमायून आतार, जुनेद पठाण, किशोर डांगे, रवींद्र पालवे, जावेद मणियार, फिरोज आतार, सुलेमान मणियार, सिकंदर शेख, सहजादे शेख, युनूस शेख, नजीर शेख, योगेश रासने, देवा पवार आदी उपस्थित होते.

नासिर शेख म्हणाले, ढाकणे यांनी एक महिन्यापासून कोरोना रुग्णांसाठी या सेंटरची उभारणी केल्याने तालुक्यातील लोकांना मोठा आधार मिळाला. गोरगरिबांची सेवा होत असून, इथे सर्व मोफत सेवा देण्यात यात आहे. संकटाच्या काळात एकमेकांना धीर देणे, हीच शिकवण सर्वधर्मीयांची आहे. संकटसमयी मानवाच्या सेवेला परमेश्वरी उपासना मानली गेली आहे. शिवाजी बडे व एम. पी. आव्हाड यांनी आभार मानले. अनिकेत निनगुरकर यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

Web Title: Shirkhurma distribution from the Muslim community at the Kovid Center