शिर्डित जोडे मारो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:35 IST2020-12-13T04:35:14+5:302020-12-13T04:35:14+5:30
दानवे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न मात्र पोलीसांनी हाणून पाडला़ यानंतर आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेवून वैयक्तीक जामिनावर मुक्तता केली. ...

शिर्डित जोडे मारो आंदोलन
दानवे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न मात्र पोलीसांनी हाणून पाडला़ यानंतर आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेवून वैयक्तीक जामिनावर मुक्तता केली.
शिवसेनेचे नेते कमलाकर कोते, उपजिल्हा प्रमुख अनिल बांगरे, तालुका प्रमुख संजय शिंदे, शहर प्रमुख सचिन कोते, विजय जगताप, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिता जगताप आदींच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत कार्यालयालगत हे आंदोलन करण्यात आले.
शिर्डी नगरपंचायतच्या प्रांगणात सकाळी अकराच्या सुमारास शिवसैनिकांनी दानवेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दानवेंचा प्रतिकात्मक पुतळा आंदोलनस्थळी आणून त्याला शिवसैनिक आणि महिला कार्यकर्त्यांनी जोडे मारत संताप व्यक्त केला. त्यामुळे शिर्डी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना कारवाईसाठी ताब्यात घेतले. याप्रसंगी राहुल गोदकर, संजय आहेर, भास्कर मोटकर, सोमनाथ गोरे, गंगाधर बेंद्रे, सतोष जोवेकर, विजय गोल्हार, अतुल चौधरी, किरण जपे, दिनेश आरणे, संदीप बावके, अमोल गायके, दिनेश शिंदे, जयराम कांदळकर, महेश महाले, हरिराम रहाणे, सुयोग सावकारे, अक्षय तळेकर, दत्ता आसने, लक्ष्मीताई आसने, कस्तुरी मुदलियार आदी उपस्थित होते.
( १२ शिर्डी दानवे )