शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीत नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 09:34 IST

नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि मुख्य लिपिकला मारहाण केल्याप्रकरणी आज नगरपंचायतीच्या कामगारांनी काम बंद आंदोलन केले आहे. 

शिर्डी- नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि मुख्य लिपिकला मारहाण केल्याप्रकरणी आज नगरपंचायतीच्या कामगारांनी काम बंद आंदोलन केले आहे. यामुळे पाणीपुरवठा स्वच्छता यासारख्या महत्त्वाच्या सेवा बंद पडल्याने साईनगरी ठप्प झाली आहे.यामुळे स्थानिक नागरिकांबरोबरच भाविकांचे हाल होत आहेत. पालखी रस्ता ते पिंपळवाडी रस्ता यामधील नऊ मीटरचा रस्ता भूसंपादन करून नगरपंचायतकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते.

न्यायालयाने नगरपालिका व भूसंपादन कारवाई योग्य असल्याबद्दलचा निर्वाळा दिला होता. तरीही अन्याय झाल्याबद्दल काही आदिवासी समाजातील नागरिकांनी याचिका दाखल केली होती नंतर ती मागे घेण्यात आली. त्यानंतर नगरपंचायत निविदा प्रक्रिया करून सदर रस्त्याचे काम सुरू केले होते. तरीदेखील सदरच्या व्यक्ती वारंवार कामात अडथळे आणत होते. त्यांनी अन्याय झाल्याच्या भावनेतून उपोषण केले होते तसेच आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. काल मुख्याधिकारी सतीश दिघे व मुख्य लिपिक मुरलीधर देसले कामाची पाहणी करत असताना या ठिकाणी या समाजातील काही तरुणांनी व महिलांनी मुख्याधिकारी दिघे यांना शिवीगाळ करून देसले यांना मारहाण केली.

पोलिसांनी घटनास्थळी येऊन काही आरोपीना पकडले तर काही पळून गेले. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणण्याबरोबरच आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे देसले यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन केले आहे घटनेतील काही तरुणांना व महिलांना अटक करण्यात आली आहे.  फरार आरोपींना अटक करून कठोर शासन करावे यासाठी हे आंदोलन सुरू आहे. सकाळपासून सर्व सेवा बंद ठेवून कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत,अशा प्रकारा मुळे सर्व विभागाच्या शासकीय कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची होऊन त्याचा विकास कामांवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी व्यक्त केली आहे

टॅग्स :shirdiशिर्डी