शिर्डी विमानतळावर इंधन भरण्याची सुविधा देणार

By Admin | Updated: July 8, 2016 23:36 IST2016-07-08T23:29:18+5:302016-07-08T23:36:23+5:30

शिर्डी विमानतळावर इंधन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पेट्रोलियम राज्यमंत्री धमेंद्र प्रधान यांनी शिर्डीत सांगितले.

Shirdi will provide refueling facilities at the airport | शिर्डी विमानतळावर इंधन भरण्याची सुविधा देणार

शिर्डी विमानतळावर इंधन भरण्याची सुविधा देणार

शिर्डी : महाराष्ट्रात मिळेल तितके इथेनॉल खरेदी करण्याची व त्याचे पेट्रोलमधील प्रमाण दहा टक्यांपेक्षाही अधिक वाढवण्याचे आमचे धोरण आहे़ मात्र पुरेसे इथेनॉल उपलब्ध होत नाही. शिर्डी विमानतळावर इंधन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पेट्रोलियम राज्यमंत्री धमेंद्र प्रधान यांनी शिर्डीत सांगितले.
यापूर्वीचे सरकार एक दीड टक्काही इथेनॉल घेत नव्हते व त्यासाठी सोळा-सतरा रूपये भाव देत होते़ आम्ही मात्र उपलब्ध असेल तितके घेण्याची तयारी ठेवली असून भावही साडे एकोणचाळीस रूपये दिला आहे़ दोन वर्षात आम्ही सहा हजार कोटींचे इथेनॉल खरेदी केल्याचे सांगत इथेनॉल विक्रीचा लाभ शेतकऱ्यांना मिळायला हवा पण तो मिळतो की नाही हे बघण्याची जबाबदारी आमची नाही तर राज्य सरकारची असल्याचेही प्रधान यांनी स्पष्ट केले़
शिर्डी विमानतळावर विमानांसाठी इंधन उपलब्ध करून देता येईल का? या विषयाकडे खा़ सदाशिव लोखंडे यांनी लक्ष वेधले़ येथे पेट्रोलियम कंपन्या इंधन पुरवण्यासाठी आग्रही राहतील व राज्य सरकारच्या माध्यमातून ही सेवा आम्ही उपलब्ध करून देऊ शकू अशी ग्वाहीही प्रधान यांनी दिली़ या सेवेमुळे विमानांच्या फेऱ्या व संख्या वाढणार असून प्रवास भाडेही कमी होऊ शकते़ आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या तरी रिफायनरी, वाहतूक आदी खर्च कमी होत नाहीत़ मात्र तेलाच्या किमती कमी झाल्याने जो फायदा झाला त्याचा पन्नास टक्के फायदा आम्ही ग्राहकाला दिला तर पन्नास टक्के रक्कम ही वीज, रस्ते, रोजगार आदी पायाभूत सुविधा व विकासकामांसाठी निधी उभारण्याकरता वापरली आणि हे उचितही होते असेही प्रधान यांनी स्पष्ट केले़ ब्रेक्झिटमुळे आंतरराष्ट्रीय घडामोडी घडल्या व त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून बाजारात तेलाच्या किमती कमी झाल्यात असेही प्रधान म्हणाले़ पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेबाबत सुधारणा झाली आहे़ त्यात अजूनही सुधारणा आवश्यक असून त्यासाठी आम्ही जादा पैसे देत आहोत, पेट्रोल पंपावरील भेसळीबाबत त्यांना छेडले असता याबाबत आपणास काहीही माहिती नाही, सर्वसाधारण तक्रार करण्यापेक्षा एखाद्या ठराविक पंपाविषयी तक्रार करा असे त्यांनी पत्रकारांना सुनावले़ यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, गजानन शेर्वेकर, राजेंद्र गोंदकर, सचिन कोते, डॉग़ाडेकर तसेच पेट्रोलियम विभागाचे अधिकारी, वितरक उपस्थित होते़
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Shirdi will provide refueling facilities at the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.