शिर्डी, पंढरपूर रेल्वे तातडीने सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:22 IST2021-01-03T04:22:23+5:302021-01-03T04:22:23+5:30

दौंड- मनमाड या रेल्वेमार्गावर सध्या पॅसेंजर रेल्वे सुरू नसल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. मुंबईकडे जाणारी पुणे- मुंबई शिर्डी ...

Shirdi, Pandharpur Railway start immediately | शिर्डी, पंढरपूर रेल्वे तातडीने सुरू करा

शिर्डी, पंढरपूर रेल्वे तातडीने सुरू करा

दौंड- मनमाड या रेल्वेमार्गावर सध्या पॅसेंजर रेल्वे सुरू नसल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. मुंबईकडे जाणारी पुणे- मुंबई शिर्डी फास्ट पॅसेंजर व साईनगर पंढरपूर या साप्ताहिक रेल्वे तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली. पॅसेंजर रेल्वे बंद असल्याने सर्वसामान्य प्रवासी प्रवासापासून वंचित राहत आहेत. पंढरपूर रेल्वेला सिटींग आरक्षण देऊन ती व्यवस्था करण्यात यावी.

नगराध्यक्षा अनुराधा आदिक, मंजूश्री मुरकुटे, अनिल कुलकर्णी, अमोल कोलते, बन्सी फेरवानी, प्राचार्य गोरख बारहाते यांनी चर्चेत भाग घेतला. रेल्वे अधिकारी देशमुख, ठाकूर, यादव यांनी श्रीरामपूर रेल्वेस्टेशनचा चेहरामोहरा बदलून टाकू, असे आश्वासन दिले. अनिल कुलकर्णी यांनी सदस्यांच्या वतीने स्वागत केले तर यादव यांनी नूतन सदस्यांचा सत्कार केला. विशाल फोपळे यांनी आभार मानले.

Web Title: Shirdi, Pandharpur Railway start immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.