शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

साईबाबांच्या जन्मस्थळाच्या उल्लेखावरून शिर्डीतील भाविकांमध्ये नाराजी; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला उल्लेख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 18:44 IST

साईबाबांनी आपल्या हयातीत आपले नाव, गाव, जात, धर्म उघड केला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र साईबाबांच्या जन्मस्थळ असलेल्या परभणी जिल्ह्यातील पाथरीचा विकास करणार असल्याचे सांगून शिर्डीकर व भाविकांची नाराजी ओढवून घेतली आहे.

शिर्डी : साईबाबांनी आपल्या हयातीत आपले नाव, गाव, जात, धर्म उघड केला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र साईबाबांच्या जन्मस्थळ असलेल्या परभणी जिल्ह्यातील पाथरीचा विकास करणार असल्याचे सांगून शिर्डीकर व भाविकांची नाराजी ओढवून घेतली आहे.साईसमाधी शताब्दी सोहळ्यात राष्ट्रपतींनी साईबाबांच्या जन्मस्थानाचा उल्लेख केला होता. यावर साईभक्त व शिर्डीकरांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, कमलाकर कोते यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिर्डीकरांनी दिल्लीत जाऊन थेट राष्ट्रपतींची भेट घेऊन जन्मस्थानाचा खुलासा केला होता. आता मुख्यमंत्री ठाकरे यांनी जन्मस्थानाचा उल्लेख केल्याने पुन्हा भाविक व शिर्डीकरांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.साईबाबांबद्दल अधिकृत डॉक्युमेंट म्हणून साईसतचरित्र हेच आहे. साईसतचरित्रात कुठेही साईबाबांच्या जन्म व जन्मस्थळाचा उल्लेख नाही. ज्या बाबी ज्ञात नाहीत त्या अज्ञात आहेत. त्याबद्दल अधिकृत बोलणे कठीण वाटते, असे साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावर यांनी सांगितले.पाथरीच्या विकासाला मदत करण्याबाबत आमचा कोणताही आक्षेप नाही. मात्र पाथरी या गावाचा साईबाबांचे जन्मस्थान असा उल्लेख करण्याला साईभक्त आणी शिर्डीकरांचा आक्षेप आहे. साईबाबांनी आपला जन्म, गाव, जात, धर्म याबद्दल कधीच कोणाला सांगितले नाही. यामुळेच बाबांची प्रतिमा सर्वधर्म समभावाची आहे. अलीकडच्या काळात जाणीवपूर्वक साईबाबांच्याच विचाराला नख लावण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे देश विदेशातील करोडो साईभक्तांच्या भावना दुखावल्या जात आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे साईबाबांचे निस्सीम भक्त असल्याने त्यांनी ग्रामस्थ व साईभक्तांच्या भावना समजावून घ्याव्यात, असे माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी सांगितले. 

शिर्डी-पाथरीच्या विकासाला साईभक्त अथवा शिर्डीच्या ग्रामस्थांचा विरोध नाही. मात्र पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ असल्याबद्दल जो उल्लेख केला गेला. त्याला आमचा विरोध आहे. याबाबत लवकरच शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबरोबर बैठक घडवून आणणार आहे, असे शिवसेना नेते कमलाकर कोते यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरsaibabaसाईबाबाUddhav Thackerayउद्धव ठाकरेshirdiशिर्डी