शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी बनावट पास विक्री उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 14:48 IST

गर्दीच्या काळात बनावट व्हीआयपी दर्शन पास तयार करून संस्थान व भाविकांची फसवणूक करणा-या दोघांना संस्थान व पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे़ या आरोपींना ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़

शिर्डी : गर्दीच्या काळात बनावट व्हीआयपी दर्शन पास तयार करून संस्थान व भाविकांची फसवणूक करणा-या दोघांना संस्थान व पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे़ या आरोपींना ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़झटपट दर्शन होण्यासाठी संस्थानकडून स:शुल्क पासेस दिले जातात. दर्शनासाठी प्रत्येकी दोनशे रुपये आकारण्यात येतात़ अनेक भाविक हे पासेस आॅनलाइनवरही काढतात. गर्दीच्या काळात अनेक भामटे बनावट पास करून भाविकांना विकतात. हा गोरखधंदा सध्या तेजीत होता़ काही पास प्रवेशद्वारात स्कॅन होत नसल्याने हे पास बनावट असल्याचे समोर आले़ भाविकांच्या मदतीने संबंधित इसमांची माहिती काढून मंदिर विभागाचे पोलीस उपाधीक्षक आनंद भोईटे, शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक डॉ़ सागर पाटील, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी मंदिर परिसरात सापळा लावला. संशयितांकडे पास घेण्यासाठी बनावट साईभक्त पाठविण्यात आला़ यात विजय गणेश वाडेकर (वय ३५), रवींद्र सुखदेव रणदिवे (वय २४, दोघेही रा. लक्ष्मीनगर) यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून बनावट पासेसही ताब्यात घेण्यात आले. या दोघांनाही पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तपासात एक मोठे रॅकेट उघडकीस येईल, असा पोलिसांना विश्वास आहे़ 

आरोपींकडून आठ हजार आठशे रुपयांचे बनावट पास जप्त करण्यात आले आहेत़ २६ जानेवारी रोजी दहा भक्तांना प्रत्येकी दोनशे रुपयांनुसार बनावट पास विकले होते़ स्कॅनिंग करताना पास बनावट असल्याचे लक्षात आले होते़ त्यावरून संस्थानच्या सुरक्षारक्षक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषन विभाग यांची टीम तयार करून सापळा रचण्यात आला होता.      -आनंद भोईटे, पोलीस उपाधीक्षक, साईमंदिर

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीsaibabaसाईबाबा