शिरसगाव - सावळगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:27 IST2021-09-10T04:27:20+5:302021-09-10T04:27:20+5:30
कोपरगाव तालुक्यातील सावळगाव ते शिरसगावमधील रस्त्यात मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने जिवाची कसरत करावी लागत आहे. सावळगावात जास्त प्रमाणात आदिवासी ...

शिरसगाव - सावळगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
कोपरगाव तालुक्यातील सावळगाव ते शिरसगावमधील रस्त्यात मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने जिवाची कसरत करावी लागत आहे. सावळगावात जास्त प्रमाणात आदिवासी लोक राहतात. त्यांना कामधंद्यासाठी शिरसगाव या आसपासच्या गावात जावे लागते. ‘पंधरा दिवसांपूर्वी कोपरगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला फोन करून विचारले, आठ दिवसात काम करू; पण आठ दिवस होऊन गेले तरी रस्ता सुधारला नाही, असे शिवाजी जाधव यांनी सांगितले. काही टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता. सतत पाऊस असल्याने काम करणे अवघड होते, असे ठेकेदार शिवाजी येवले यांनी सांगितले.
....................
सोमवारी शिरसगाव, सावळगाव रस्त्याच्या कामास सुरवात होणार आहे. पहिल्यांदा मुरूम टाकून खड्डे बुजवले जातील. त्यानंतर एक महिन्याने त्यावर मजबूत डांबरीकरण केले जाईल. एकदा काम सुरू झाल्यावर ते पूर्णच केले जाणार आहे.
- प्रशांत वाकचौरे, कोपरगाव सार्वजनिक बांधकाम अभियंता