बँक प्रशासनाच्या दबावातून शिंदे यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:25 IST2021-08-13T04:25:26+5:302021-08-13T04:25:26+5:30

निवेदन देतेवेळी मयत शिंदे यांच्या पत्नी संगीता, विशाल शिंदे, चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, प्रतिक शिंदे, प्रियांका शेंडे, ...

Shinde commits suicide under pressure from bank administration | बँक प्रशासनाच्या दबावातून शिंदे यांची आत्महत्या

बँक प्रशासनाच्या दबावातून शिंदे यांची आत्महत्या

निवेदन देतेवेळी मयत शिंदे यांच्या पत्नी संगीता, विशाल शिंदे, चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, प्रतिक शिंदे, प्रियांका शेंडे, किरण शेंडे, कारभारी शिंदे, कचरू शिंदे, दीपक शिंदे आदी उपस्थित होते. शिंदे हे अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी २७ जुलै रोजी विष घेऊन आत्महत्या केली. शिंदे हे प्रामाणिक अधिकारी म्हणून परिचित होते. तीन महिन्यांपूर्वी त्यांची बँकेतून सेवानिवृत्ती झालेली होती; परंतु बँक प्रशासनाने त्यांना पुढील तीन महिने बढती दिली होती. बँकेच्या शेवगाव शाखेत झालेल्या सोने तारण अपहारप्रकरणी शिंदे यांनी २०१८ मध्ये पुराव्यासह बँक प्रशासनास माहिती दिली होती; परंतु बँक प्रशासनाने या गैरकारभार व भ्रष्टाचारप्रकरणी कुठलीही ठोस कारवाई केली नाही. उलटपक्षी शिंदे यांना याविषयी गप्प राहण्याचे सांगितले. दरम्यान शिंदे सेवा निवृत्तीनंतरची पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटीची रक्कम मिळावी म्हणून बँक प्रशासनाकडे पाठपुरावा करीत होते; परंतु बँक प्रशासनाने चालढकल करून त्यांना अपमानित केले. बँकेचा गैरकारभार व भ्रष्टाचार उघड होऊ नये व प्रशासनाच्या मनाप्रमाणे काम करावे म्हणून शिंदे यांच्यावर अधिकाऱ्यांनी दबाव टाकला होता. त्यामुळे या आत्महत्येची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

१२ निवेदन

ओळी- नगर अर्बन बँकेतील व्यवस्थापक गोरक्षनाथ शिंदे यांच्या आत्महत्या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी शिंदे यांच्या कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आली. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन देण्यात आले.

Web Title: Shinde commits suicide under pressure from bank administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.