शेवगाव-नेवासा राष्ट्रीय महामार्ग रोखला
By | Updated: December 9, 2020 04:16 IST2020-12-09T04:16:01+5:302020-12-09T04:16:01+5:30
मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, अखिल भारतीय किसान सभा, ...

शेवगाव-नेवासा राष्ट्रीय महामार्ग रोखला
मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, अखिल भारतीय किसान सभा, हमाल मापारी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते, शेतकऱ्यांनी शहरातील क्रांती चौकात रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अरुण लांडे, नगरसेवक संजय फडके, वंचितचे किसन चव्हाण, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल फडके, सेनेचे अविनाश मगरे, शीतल पुरनाळे, भाकपचे संजय नांगरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत भराट, दत्ता फुंदे, बाळासाहेब फटांगडे, भाऊ बैरागी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या रास्ता रोको आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवगाव शहर, बोधेगाव भागातील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेऊन भारत बंद आंदोलनाला प्रतिसाद दिला.
दरम्यान, पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव-नेवासा राज्य मार्गावरील ढोरा नदी पुलावर शेकडो शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सरकारी कार्यालये, बँक, संस्था सुरू होत्या तर राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसच्या फेऱ्या सकाळी दहा वाजेपर्यंत सुरू होत्या. त्यानंतर प्रवाशांच्या प्रतिसाद नसल्याने फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे आगारप्रमुख वासुदेव देवराज यांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
..
०८शेवगाव रास्तारोको
...