शेवगावला पावसाने झोडपले

By Admin | Updated: June 5, 2014 00:08 IST2014-06-04T23:23:09+5:302014-06-05T00:08:47+5:30

शेवगाव : शेवगाव शहर तसेच नजीकच्या वाड्यावस्त्यांसह तालुक्यातील ताजनापूर, बोडखा, जुने व नवीन दहिफळ, खानापूर, कºहेटाकळी,

Shevgah rains in rain | शेवगावला पावसाने झोडपले

शेवगावला पावसाने झोडपले

शेवगाव : शेवगाव शहर तसेच नजीकच्या वाड्यावस्त्यांसह तालुक्यातील ताजनापूर, बोडखा, जुने व नवीन दहिफळ, खानापूर, कºहेटाकळी, सोनेसांगवी, चापडगाव, कोळगाव, घोटण, भातकुडगाव, जोहरापूर, ढोरजळगाव, सामनगाव, मळेगाव, लोळेगाव व परिसरातील अनेक गावांना मंगळवारी व बुधवारी झालेल्या वादळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. काही गावांना तर सलग दोन दिवस वादळी वार्‍यासह पर्जन्यवृष्टी झाली. या पावसामुळे शेतकर्‍यांच्या केळी, डाळिंब, चिकू, मोसंबी आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले तर वादळी वार्‍यामुळे अनेकांच्या घरावरील, शेती वस्तीवरील पत्रे उडून गेले. शेवगाव शहर व परिसरात वार्‍याचा वेग मोठा होता. प्रथम काहीवेळ धुळीचे लोट उठले होते. वादळी वार्‍यामुळे काही छोट्या व्यावसायिकांच्या दुकानावरील पत्रे उडून मुख्य बाजारपेठेत पडले. मात्र व्यवहार कडकडीतबंद असल्याने अप्रिय घटना घडली नाही. ग्रामीण परिसरात ठिकठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्याने शेवगाव, पैठण राजमार्गावरील वाहतूक खानापूर, कºहेटाकळी परिसरात बराचवेळ खोळंबली होती. बुधवारी नागरिकांसह काहींनी मोडून पडलेली झाडे, मोठ्या फांद्या बाजूला केल्यानंतर दुपारी उशिराने बंद पडलेली वाहतूक पुन्हा सरुळीत होण्यास यश मिळाले. तर काही मोठाली झाडे व खोड रस्त्यावर अजूनही आडवी असल्याने वाहतुकीस अडसर कायम असल्याच्या स्थानिक नागरिकातून तक्रारी आहेत. सलग तीन दिवस वादळी वार्‍यासह होणार्‍या पावसामुळे जनजीवनास हानी पोहचली असताना प्रशासन अथवा स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिकातून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. वादळ, वारा यासह पडलेल्या पावसाने शेवगाव शहराचा वीज पुरवठा सलग ६ ते ७ तास बंद राहिला तसेच मंगळवारी व बुधवारी रात्रभर विजेचा पाठशिवणीचा खेळ सुरू राहिल्याने शेवगावकरांना वीज टंचाईच्या समस्येशी सामना करावा लागल्याने जनजीवन हैराण झाले आहे.(तालुका प्रतिनिधी) मयताच्या वारसाला मदत शेवगाव तालुक्यातील माळेगावने येथील आदिनाथ गणपत गाडेकर या २२ वर्षांच्या तरुण शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली शासनाच्या आपत्तीकालीन योजनेतून मयत शेतकर्‍याच्या वारसाला दीड लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार हरीष सोनार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Shevgah rains in rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.