भाकड गायींना श्रीकृष्ण गोशाळेचा आसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:36 IST2020-12-13T04:36:02+5:302020-12-13T04:36:02+5:30
तिसगाव : घोडेगाव-सोनई हद्दीत कत्तलीसाठी जाणाऱ्या सात भाकड गायी अप्पर पोलीस अधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पकडल्या. गायी वयोवृद्ध ...

भाकड गायींना श्रीकृष्ण गोशाळेचा आसरा
तिसगाव : घोडेगाव-सोनई हद्दीत कत्तलीसाठी जाणाऱ्या सात भाकड गायी अप्पर पोलीस अधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पकडल्या. गायी वयोवृद्ध व भाकड असल्याने त्यांचा यथोचित सांभाळ करण्याच्या पोलिसांनी केलेल्या विनंतीला बऱ्याच ठिकाणी प्रतिसाद मिळाला नाही. अखेर शनिवारी दुपारी चितळी-दिंडेवाडी शिवारातील श्रीकृष्ण गोशाळेत मात्र यांना आसरा मिळाला. गोरक्षक वसंत फूलमाळी, पोलीस कर्मचारी संदीप बर्डे यांनी शुक्रवारी रात्री ही कारवाई केली. औरंगाबादच्या कत्तलखान्याकडे जाणारे मालवाहू वाहन शनिवारी दुपारी श्रीकृष्ण गोशाळेत आणले. त्या गायींना जखमा झाल्या होत्या. गोशाळेचे कार्यवाह दीपक महाराज काळे यांनी तात्काळ पशुवैद्यकीय चिकित्सकांना पाचारण करून त्यांच्यावर उपचार केले. स्वतंत्र दावणीसह हिरवा चारा गायींना देण्यात आला. या गोशाळेत पाच वर्षांपासून ११५ भाकड गायींचे संगोपन केले जात आहे.